माथेरान येथील  दरीत कोसळून महिला ठार

माथेरान : पोलीसनामा ऑनलाईन – माथेरानच्या बेल्व्हीडीअर पॉईंटर येथे फिरायला गेलेल्या कुटुंबातील एक महिला खोल दरीत पडल्याने ठार झाली आहे.

संगिता मिश्रा असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी ही महिला दरीत कोसळून ठार झाली.

मुंबईहून संगिता मिश्रा या पती, २ लहान मुली, त्यांचा एक मित्र असे फिरायला आली होती. शनिवारी सकाळी हे कुटुंबिय सात पॉईंट सर्कल पाहत असताना बेलविडीयर पॉईंट येथे गेल्यानंतर दगडाची ठेच लागल्याने दुपारी अडीचच्या सुमारास तिचा तोल गेला आणि ८०० फुट खोल दरीत ती कोसळली. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि माथेरान मधील सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सदस्य़ांनी खोल दरीत उतरून तीन तासांनंतर महिलेचे पार्थिव वर आणले,