दुर्देवी ! वीजवाहक तारा अंगावर पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावात वीजवाहक तार अंगावर पडून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. वाचविण्यासाठी गेलेली त्याची चुलतीही तारेला चिटकली होती. मात्र तिच्या मुलाने हातावर काठी मारून आईला वाचविले. प्रवीण लक्ष्मण सुपेकर (वय २७) हे मयताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रवीण सुपेकर हा तरुण शेतकरी आपल्या आई-वडिलांसोबत खंदरमाळवाडीतील भोईटे मळा येथे राहतात. सध्या पेरण्यांचे दिवस सुरू असल्याने रविवारी दुपारी प्रवीण हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीत रोटाव्हेटर मारत होते. त्याच दरम्यान शेजारुन गेलेली वीजवाहक तार तुटून थेट प्रवीणच्या अंगावर पडली. शेजारीच त्यांची चुलती सुनीता तुकाराम सुपेकर या शेतात काम करीत होत्या. त्यांनी तार पडल्याचे पाहून प्रवीणला वाचवण्यासाठी त्यांच्या दिशेने धाव घेतली. सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्याही वीजवाहक तारेला चिटकल्या. त्यांचा मुलगा रमेश याने आपल्या आईला व चुलत भावाला वाचवण्यासाठी काठी घेवून त्यांच्या दिशेने धाव घेतली. काठीने आईच्या हातावर जोराने मारले. त्यामुळे सुदैवाने त्या बचावल्या, तर प्रवीण यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक बातम्या

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे