धक्‍कादायक ! निलंबीत पोलिस कर्मचार्‍यानेच युवकाच्या खूनाचा रचला ‘कट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गाडीला वाट न दिल्याच्या कारणावरून गणेश म्हस्के (वय-२२) या तरूणाचा खून करण्यात आल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली होती. तरुणाच्या खून प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणाच्या खूनाचा कट निलंबित पोलीसानेच रचल्याचे तपासात समोर आले आहे.

घाटकोपर परिसरात बुधवारी (दि.१९) रात्री गणेश म्हस्के साईनाथ परिसात एका रस्त्याच्या कडेला दुचाकी घेऊन उभा होता. त्यावळी कारमधून आलेल्या चौघांनी गणेशला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाले. याच वादातून चौघांनी गणेशला बेदम मारहाण करून त्याला एका नाल्यात ढकलून दिले. यामध्ये गणेशचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असून एक पथक दापोली येथे रवाना करण्यात आले आहे.

घटनास्थळी असलेल्या दोन गाड्या पोलिसांनी जप्त करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी घटनास्थळावरून इनोव्हा कार जप्त केली होती. चार आरोपींमध्ये एका निलंबित पोलीसाचा सहभाग असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून देण्यात येत आहे. गणेश म्हस्के याच्या खूनाचा कट निलंबित पोलीसानेच मित्रांसह आखल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी

मानसिक आजारांवर वेळीच उपचार करणे गरजेचे

या कारणामुळे होतो ” ब्रेस्ट कॅन्सर “जाणून घ्या याची लक्षणे

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …!