संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बाजीराव’चा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्वांचे आकर्षण असलेल्या पाढऱ्या वाघाचा आज मृत्यू झाला. वयोमानामुळे उद्यानातील पाढऱ्या वाघाचा मृत्यू झाला ‘बाजीराव’ या असे या वाघाचे नाव आहे. या वाघाचा जन्म २००१ मध्ये रेणुका आणि सिद्धार्थ या वाघांच्या जोडीपासून झाला होता. बाजीरावचा मृत्यू आज (शुक्रवार) झाल्याने उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संधिवात आणि स्नायु दुखीमुळे तो गेल्या चार वर्षापासून त्रस्त होता. मागील दहा दिवसांपासून त्याला चालताही येत नव्हते. त्याच्यावर उपचार सरू असताना बाजीरावचा मृत्यू झाला.

या वाघाची कातडी जतन करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. यामुळे शवविच्छेदनानंतर वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रीय उद्यानाच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सध्या सहा वाघ अस्तिवात आहेत. यामध्ये दोन नर असून चार माद्या आहेत. माद्यांमध्ये बसंती ही वृद्ध मादी असून तिची मुलगी लक्ष्मीदेखील या ठिकाणी आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्पामधून आणण्यात आलेल्या मस्तानी आणि बिजली या माद्यादेखील प्रकल्पामध्ये नादंत आहेत. नर वाघांमधील बाजीरावचा आज मृत्यू झाल्याने आनंद-यश नावाचे सात वर्षांचे दोन वाघ सध्या उद्यानात आहेत.