थंडी वाजते म्हणून उन्हात बसलेल्या वृद्धाला टेम्पोने चिरडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिकअप टेम्पो रिवर्स घेऊन मागे न पाहता टेम्पोच्या मागे थंडी वाजत असल्याने उन्हाला बसलेल्या ८१ वर्षीय़ वृद्धाला चिरडून टेम्पोचालक पसार झाल्याची घटना धनकवडी येथे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. यात वृद्धाचा मृत्यू झाला.

सर्जेराव तुकाराम तनपुरे (८१, धनकवडी) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तात्रय़ रामचंद्र हिरगुडे (३१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पोचालक गणेश पासलकर याच्याविरोधात सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्जेराव तनपुरे हे फिर्यादी हिरगुडे यांच्या बहिणीचे सासरे आहेत. ते फिर्यादी यांच्या येथे राहात होते. दरम्यान सोमवारी दुपारी थंडी वाजत असल्याने ते उन्हाला म्हणून धनवकवडी येथील वनराई क़ॉलनी परिसरात पार्क केलेल्या महिंद्रा पिक अप टेम्पो क्र. एम. एच. १२, के. पी. ७६२५ च्या पाठीमागे बसले होते. त्यावेळी टेम्पोचालक तेथे आला. त्यानंतर त्याने पिकअप पाठीमागे घेतला. त्यावेळी टेम्पो तनपुरे यांच्या अंगावरून गेला. स्थानिकांनी आरडाओरडा केला. मात्र तोवर तो तेथून टेम्पो घेऊन पसार झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सहकार नगर पोलीस करत आहेत.