मातीचा ढिगारा अंगावर पडून एका कामगारचा मृत्यू 

दिघी : पोलीसनामा ऑनलाईन
दिघी येथील चोवीसावाडी येथे रस्त्यावर चेंबर टाण्याचे काम सुरु असताना मातीचा ढिगारी अंगावर पडल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर एक कामगार जखमी झाला आहे. ही घटना आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

मनोज कुमार रावत (वय-२५, रा. मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर बाळू नामदेव भिंगारदिवे (वय-५०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’072226f1-7eb1-11e8-bc35-cb79dff0ea84′]

मिळालेल्या माहितीनुसार, चोवीसावाडी येथे ड्रेनेजचे काम सुरु आहे. दोन्ही कामगार १५ फूट खोल ड्रेनेजमध्ये काम करत होते. ड्रेनेज चे काम सुरू असताना जेसीबीच्या साहाय्याने खड्ड्यातील माती काढून शेजारी टाकण्यात आली होती. अचानक पाऊस सुरु झाल्याने ड्रेनजच्या शेजारच्या मातीचा ढिगारा खड्ड्यात कोसळला. यावेळी खड्ड्यामध्ये काम करत असणारे मनोज आणि बाळू मातीच्या ढिगाऱ्याखाली आडकले. यामध्ये मनोज रावत याचा गुदमरुन मृत्यू झाला तर बाळू भिंगारदिवे गंभीर जखमी झाले. बाळू भिंगारदिवे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपाचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.