मारहाणीत युवकाचा मृत्यू, पुण्यातून दोघांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – स्वस्तिक चौकातील बसस्थानकासमोर झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यूप्रकरणी नगरच्या ‘एलसीबी’ने पुण्यातून दोघांना अटक केली आहे. 29 एप्रिल रोजी झालेल्या मारहाणीत जखमी किरण जगताप यांचा मंगळवारी (दि. 4) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मयताचे नातेवाईक आक्रमक झाले होते. आज ही कारवाई करण्यात आली.

पोलीसनामावरील ताज्या बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन पोलीसनामाचे फेसबुक पेज आत्ताच लाईक करा.

अटक केलेल्या आरोपींमध्ये शेख फैजान अब्दुल रौफ ऊर्फ फैजान बाबासाहब जहागीरदार (वय २६), शेख अराफत अब्दुल रौफ उर्फ अराफत बाबासाहब जहागीरदार (वय २४, दोघे रा. जुना बाजार, खिस्त गल्ली, नगर) यांचा समावेश आहे. आणखी पाच जण फरार आहेत. ते पुण्यातील कोंढवा येथे होते.

दि. २९/०४/२०१९ रोजी सायंकाळी ५/०० वा. चे सुमारास पुणे बस स्थानक समोर किरण उध्दव जगताप (वय- २० वर्षे, रा. बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन, नगर) यांना किरकोळ कारणावरुन अनोळखी मुलांनी कोणत्या तरी हत्याराने डोक्यावर मारहाण करुन गंभीर जखमी करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हा घडल्यापासून आरोपी हे पुण्यातील कोंढवा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक सचिन खामगळ, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब काळे, मोहन गाजरे, विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, संदीप घोडके, संदीप चव्हाण, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे, चालक बाळासाहेब भोपळे यांनी कोंढवा, पुणे येथे जाऊन सापळा रचला. कोंढवा येथून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.