विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विज दुरुस्तीचे काम करणाऱ्या वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आज दुपारी नेवासा तालुक्यातील बेलपांढरी फाटा येथे ही घटना घडली.

नितीन घोरपडे हे मयत वायरमनचे नाव आहे. शनिवारी (13) रोजी सायंकाळी झालेल्या वादळात महावितरणची विद्युत सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली होती.म्हणून रविवारी सकाळी 11 वा. दरम्यान बेलपांढरी फाटा येथे लाईटचा झालेला तांत्रिक बिघाड दुरुस् करण्यासाठी नितीन घोरपडे वीजेच्या खांबावर चढला होता. त्यावेळी त्याला विजेचा जबर धक्का बसल्याने तो जागीच ठार झाला. नितीन जवळपास दोन ते तीन तास विद्युत खांबावर तसाच लटकलेल्या अवस्थेत होता.

याबाबत वीज वितरण कंपनीला कळवले तरीही महावितरणचे वरिष्ठ कोणतेही अधिकारी तिकडे फिरकलेच नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढतच होता संतप्त झालेल्या लोकांनी मृतदेह वीज वितरण कंपनी च्या 132 के व्ही च्या कार्यालया समोर आणून ठेवला होता. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता.

You might also like