सावधान ! ‘PUBG’चा ‘विध्वंस’ सुरूच, खळता-खेळता ‘बशीर’चा जीव गेला

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – ऑनलाईन व्हीडिओ गेम पब्जीचे अनेकांना वेड लागले आहे. त्यामुळे अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. पब्जीने पुन्हा एकदा एका १९ वर्षीय तरूणाचा जीव घेतला आहे. जम्मू- काश्मीरच्या श्रीनगरमधील ही घटना असून फोनवर पब्जी खेळताना या तरूणाचा मृत्यू झाला आहे. असीम बशीर असं या मुलाचे नाव असून गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.

'पबजी' का कहर जारी, खेलते-खेलते चली गई बशीर की जान, रहें सावधान

बशीर त्याच्या श्रीनगरपासून काही अंतरावर असणाऱ्या चानापोरा येथील मित्राच्या घरी गेला होता. सकाळच्यावेळी मित्र आणि त्याच्या घरचे नाश्त्यासाठी त्याची वाट पाहत होते. परंतू तो २५ जुलैच्या रात्री गेम खेळताना बेशुद्ध झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

'पबजी' का कहर जारी, खेलते-खेलते चली गई बशीर की जान, रहें सावधान

पोलीसांनी सांगितल्यानुसार श्रीनगरमधील ही अशी पहिली घटना आहे. मात्र देशात अनेक तरूणांचा आणि लहान मुलांचा जीव गेला आहे. पब्जी ही व्हीडिओ गेम सध्या तरूण वर्गात अधिक प्रसिद्ध आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचे धोकेही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यापूर्वी मध्यप्रदेशमधील फुरकान कुरेशी नावाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तसंच तेलंगना येथील २० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तो ४५ दिवस सतत पब्जी खेळत होता. त्यामुळे त्याची मान दुखण्यास सुरुवात झाली होती. यावर उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. मुंबईत १८ वर्षांच्या मुलाने पब्जीसाठी पालकांनी नवीन फोन घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या केली होती. तसंच तेलंगना येथेही अशीच काहीशी घटना घडली होती.

'पबजी' का कहर जारी, खेलते-खेलते चली गई बशीर की जान, रहें सावधान

दरम्यान, तरूणांना लागलेले पब्जीचे वेड अधिक गंभीर होत चालले आहे. तरूणवर्ग पब्जीमुळे काम, अभ्यास सर्व सोडून पब्जीत गुंतत आहे. त्यांच्यातील पब्जीचे वेड अधिक वाढल्याने त्यांचे मानसिक संतुलन डळमळीत होत आहे. त्यामुळे पब्जीची समस्या अधिक गंभीरतेने घेणे गरजेचे आहे.

'पबजी' का कहर जारी, खेलते-खेलते चली गई बशीर की जान, रहें सावधान

आरोग्यविषयक वृत्त –