‘फाशी’चा ‘दोर’ लावण्यापूर्वी ‘जल्लाद’ कैद्याच्या कानात नेमकं काय ‘पुटपुटतो’ ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकणातील आरोपी मुकेश, पवन, विनय आणि अक्षय या आरोपींना 12 डिसेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. लवकरच मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. बिहारमधील बक्सर कारागृहाला या आठवड्याच्या अखेरीस फाशी देण्याचा दोर तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या महिन्याच्या अखेरीस शिक्षेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. 7 वर्षांपूर्वी 16 डिसेंबर रोजी निर्भयावर बलात्कार झाला होता. त्याच दिवशी तिला न्याय मिळण्याची शक्यता आहे. असे असतानाचा आता जल्लाद आणि त्याच्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबबत आपण जाणून घेणार आहोत. फाशी देताना जल्लाद कैद्याच्या कानात काहीतरी पुटपुटतो. ते नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

बक्सर कारागृहात फार पूर्वीपासून फाशीचे दोर तयार केले जात आहेत. संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरूला फासावर लटकवण्यासाठी याच तुरुंगातून दोर तयार करण्यात आला होता. यासाठी 7200 कच्चे धागे वापरले जातात. सर्व कैदी हातानं हे काम करतात. यासाठी तीन दिवस लागतात. 5-6 कैदी यावर काम करतात.

फाशीपूर्वी कैद्याला अंघोळ घातली जाते. नवीन कपडे घातले जातात. त्याला शेवटची इच्छा विचारली जाते. यात कुटुंबियांना भेटणं तसेच चांगलं जेवण खाण्याची इच्छा असते. त्याच्या चेहऱ्यावर काळा कपडा टाकून गळ्याभोवती दोरखंड लावला जातो. याक्षणी फक्त जल्लादच त्याच्यासोबत असतो. कैदी फासावर लटकण्याच्या अंतिम क्षणी जल्लाद कैद्याच्या कानात म्हणतो, “हिंदूंना राम राम आणि मुस्लिमांना माझा सलाम, मी माझ्या कामापुढे हतबल आहे. तुम्ही सत्याच्या मार्गाने चालाल अशी मी प्रार्थना करतो.”

कैद्याच्या फाशीचं वॉरंट आल्यानंतर कैद्याला सांगितलं जातं की, तुला फाशी देण्यात येणार आहे. प्रत्येक राज्यातील तुरुंगात स्वत:चे मॅन्युअल असते. नियमांच पालन करूनच फाशीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्याशिवाय फाशीची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते. कैद्याच्या कुटुंबियांना 10-15 दिवस आधी सूचना दिली जाते. त्यांना अंतिम संस्कारासाठीही संधी दिली जाते. फाशीच्या वेळी जल्लाद व्यतिरीक्त तीन अधिकारी हजर असतात. यात तुरुंग अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी असतात. फाशीच्या वॉरंटवर कैद्याचीही सही असते. त्याला सकाळी 6, 7 किंवा 8 वाजताच्या दरम्यान फाशी दिली जाते. यावेळी इतर कैदी झोपेत असतात. कैद्याला इतरांपासून वेगळं ठेवलं जातं. त्याची पूर्ण तपासणीही केली जाते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/