पंजाब : विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 86 लोकांचा मृत्यू, 6 अधिकारी आणि 7 पोलीस निलंबित, 25 जण अटकेत

चंदीगड : वृत्त संस्था – पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मरणार्‍यांची संख्या सतत वाढत चालली आहे. शनिवारी रात्री उशीरा ही संख्या वाढून 86 झाली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी या प्रकरणात 7 उत्पादन शुल्क अधिकारी आणि 6 पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. ही माहिती येथील अधिकार्‍यांनी दिली. सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी दोन-दोन लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर या प्रकरणात आतापर्यंत 25 लोकांना अटक करण्यात आली आहे.

कुठे किती मृत्यू
विषारी दारू प्यायल्याने सर्वात जास्त तरन तारनमध्ये 63 मृत्यू झाले आहेत, त्यानंतर अमृतसरमध्ये 12 आणि गुरदासपुरच्या बटालामध्ये 11 मृत्यू झाले. राज्यात बुधवारी रात्रीपासून शुक्रवारी रात्रीपर्यंत 39 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

6 अधिकारी आणि 7 पोलीस सस्पेन्ड
एका अधिकृत वक्तव्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी 6 पोलीस कर्मचार्‍यांसह 7 उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. निलंबित अधिकार्‍यांमध्ये दोन उप पोलीस अधीक्षक आणि चार ठाणे प्रभारी आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, याप्रकरणात कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. विषारी दारूचे उत्पादन आणि विक्री रोखण्यात पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकार्‍यांचे अपयश ही शरमेची बाब आहे.

दारूत स्पीरीटचा वापर
उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी सांगितले की, पोलिसांच्या छापेमारीत जप्त दारूचा रासायनिक अहवाल अद्याप आलेला नाही, परंतु प्राथमिक तपासानुसार हे रसायन असे खराब स्पीरीट आहे, ज्याचा वापर पेंट किंवा हार्डवेयर उद्योगात केला जातो. पोलिसांनी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त स्थानिक छापेमारीत आणखी 17 लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी अमृतसर, गुरदासपुरच्या बटाला आणि तरन तारनमध्ये विषारी दारू प्रकरणात शुक्रवारी आठ लोकांना अटक केली होती.

सीएमचे आवाहन – राजकारण करू नका
सीएम अमरिंद सिंह यांनी विरोधी पक्ष शिरोमणी अकाली दलास या दुर्घटनेचे राजकार न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, अशाप्रकारच्या घटना त्यांच्या कार्यकाळात सुद्धा झाल्या आहेत. 2012 आणि 2016 चे त्यांनी उदाहरण दिले. ते म्हणाले, 2016 च्या प्रकरणात तर एफआयआर सुद्धा दाखल झाली नाही आणि कुणाला अटकही झाली नव्हती. शिरोमणी अकाली दलाने शुक्रवारी पंजाब आणि हरियाणा कोर्टाच्या सिटिंग जजकडे न्यायालयीन चौकशीची मागणी केली, तर आम आदमी पाटीने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता.