भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 33 वर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भिंवडीत तीन मजली इमारत कोसळून झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 33 वर पोहचली आहे. ठाणे महापालिकेने या दुर्घटनेतील सर्व मृतांची ओळख देखील पटवली असल्याचे सांगण्यात आले आहे. इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दुर्घटनेत जखमी झालेल्यांना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भिवंडी महापालिकेने शहरातील 102 धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून, अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जात असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित अपघात झालेली इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावली होती.

जिलानी इमारत दुर्घटनाप्रकरणी तत्कालीन प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि अभियंता दुधनाथ यादव यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.