Post_Banner_Top

खेळताना ओढणीचा फास लागून १२ वर्षीय चिमूकल्याचा मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लहान भावासोबत खेळताना ओढणीचा फास बसून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उस्मानपुरा भागातील नागसेननगर परिसरात घडला.

आरमान अजीम कुरेशी (वय १२, रा. उस्मानपुरा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

अऱमानचे वजील मुंबईत पेंटर म्हणून काम करतात. तर त्याची आई धुणी भांडी करते. त्याला एक बहिण आणि ८ वर्षांचा लहान भाऊ आहे. अरमानची आई गुरुवारी दुपारी कामासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी त्याचा भाऊ, बहिण आणि तो असे तिघे घरात होते. त्यावेळी अरमानचा लहान भाऊ आणि तो ओढणीशी खेळत होते.

त्यावेळी त्याला अचानक ओढणीचा फास बसला. त्यामुळे तो बेशुध्द पडला. दरम्यान खुप वेळ झाला तरी तो हालचाल करत नसल्याने त्याच्या लहान भावाने याची माहिती बहिणीला दिली. तोवर त्याची आई घऱी आली. तिने अरमानला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. ततेथे उपचार सुरु असताना रात्री पावणेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.दत

Loading...
You might also like