इतकी उष्णता की थर्मामीटर देखील तुटेल, ‘डेथ व्हॅली’मध्ये रेकॉर्ड 54 अंशच्या वर पोहचला पारा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅली म्हणजेच धोकादायक दरीमध्ये भीषण उष्णता जाणवत आहे. अमेरिकेच्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, तापमान तीन अंकामध्ये गेले आहे. रविवारी पारा 130 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत पोहोचला, म्हणजे 54.4444 अंश सेल्सिअस. असे म्हटले जात आहे की, पृथ्वीच्या इतिहासात तिसऱ्यांदा पारा इतक्या अंकाना स्पर्श करत आहे. ही उष्णता 89 वर्षानंतर नोंदली गेली आहे.

वर्ल्ड मटेरियलॉलॉजिकल ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) मधील एक्सट्रीम टेम्परेचर टीमचे प्रमुख आणि अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर, रॅन्डी सरवेनी म्हणाले की, ऑगस्ट महिन्यात पृथ्वीवर आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान असू शकते. याची चौकशी सुरू आहे. यापूर्वी 1913 मध्ये डेथ व्हॅलीमध्ये तापमान 56.67 डिग्री सेल्सियस तर 1931 मध्ये ट्युनिशियामध्ये 55°से होते पण दोन्ही तापमान जुलै महिन्यातील होते. ऑगस्ट महिन्यात हे तापमान गाठण्याची बहुदा पहिलीच वेळ आहे.

रॅन्डी म्हणाले की, रविवारी नोंदविलेले तापमान (54.4 डिग्री सेल्सियस) गेल्या काही वर्षांत त्याच ठिकाणी नोंदविण्यात आलेल्या 53.9 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. गेल्या काही वर्षांत पारा 53.9 अंशांपर्यंत पोहोचला होता. प्रो. रॅन्डी म्हणतात की, कोणीही 54.4 डिग्री सेल्सियस चुकीचे असल्याचे सिद्ध करू शकत नाही. परंतु विचार करण्यासारखी बाब म्हणजे पृथ्वी वेगाने तापत आहे. भविष्यासाठी हा एक भयानक धोका आहे.

रॅन्डी म्हणाले की, पश्चिमेकडे जास्त दाबाचे क्षेत्र कायम आहे. तथापि, दक्षिण-पश्चिमेस मान्सूनसारखी परिस्थिती आहे. पण कोणत्याही क्षेत्रात आराम नाही. तापमान मोजण्यासाठी फिनिक्स सिस्टमवर सामान्य दिवसांमध्ये पारा 90 डिग्री फरेनहाइटच्या खाली जात नाही. कॅलिफोर्नियाच्या चिलकूटमध्ये जंगलात आग लागली आहे. यामुळे फायर टॉर्नेडो बनला आहे. ज्यामुळे खूप मोठ्या भागात जंगले जळत आहेत. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.

डेथ व्हॅलीमध्ये तापमान 54.4 डिग्री सेल्सिअस पर्यंत मोजले गेले ते ठिकाण फर्नस क्रीक आहे. येथेच 1913 मध्ये 10 जुलै रोजी पारा 56.67 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला होता. जे आतापर्यंत पृथ्वीचे सर्वाधिक नोंदवलेले तापमान आहे. आता प्रा. रॅन्डीची टीम या तपमानाच्या कारणास्तव, भविष्यात त्याच्या दुष्परिणामांचा अभ्यास करीत आहे. तसेच हवामान बदलाशी ते किती संबंधित आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर ग्लोबल वार्मिंगशी त्याचा किती संबंध आहे ते देखील जाणून घेत आहे.

डेथ व्हॅलीला भेट देणाऱ्या पर्यटकांना जाण्याच्या आधी चार लिटर पाणी पिण्याची सूचना देण्यात आली आहे. याशिवाय, तेथे फिरताना जास्त पाणी प्या. अतिरिक्त पाणीही ठेवा. असेही सांगण्यात आले आहे. कारण या ठिकाणी काही वेळातच माणूस उष्णतेमुळे अल्पावधीतच गंभीर अवस्थेत पोहोचतो.