Debashish Chakraborty | राज्याला मिळाले नवे नवीन मुख्य सचिव, सिताराम कुंटेंनी सोपवला देबाशीष चक्रवर्तींकडे पदभार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे (State Chief Secretary Sitaram Kunte) यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या जागी आता नियोजन विभाग अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांची निवड झाली आहे. सिताराम कुंटे यांनी देबाशिष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांच्याकडे पदभार सोपवला आहे.
महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपत अल्यामुळे त्यांना वारंवार मुदतवाढ (Extension) देण्यात आली होती. कुंटे यांना सतत मुदतवाढ देण्यात असल्यामुळे अनेक वेळा वाद निर्माण झाला होता. अखेर राज्य सरकारने (State Government) त्यांना मुदतवाढ देण्याचं टाळलं. त्यामुळे नियोजन विभाग अतिरिक्त मुख्य सचिव असलेले देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चक्रवर्ती यांच्या नियुक्तीबद्दल 1 महिन्यापूर्वीच प्रस्ताव दिला होता. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
देबाशिष चक्रवर्ती यांना तीन महिने कार्यकाळ मिळणार आहे. ते फेब्रुवारी 2022 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.
Web Title : Debashish Chakraborty | appointment of debashish chakraborty as chief secretary of maharashtra State Chief Secretary Sitaram Kunte
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 78 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी
- Omicron Variant | ओमिक्रॉन व्हेरिएंटवर WHO ने जारी केला इशारा, म्हटले – ‘हाय रिस्क’
- CP Bipin Kumar Singh | परमबीर आणि वाझे भेटीवर नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांचा खुलासा; म्हणाले – ‘आम्हाला काही माहिती नाही’