Debit Card Fraud | डेबिट कार्ड फ्रॉडच्या नवीन पद्धती वापरताहेत सायबर गुन्हेगार, बचावासाठी ‘या’ सूचना जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Debit Card Fraud | डेबिट कार्डद्वारे व्यवहारात अनेक प्रकारचे फायदे आहेत. याचा वापर करून खात्यातून रोकड काढू शकता. तसेच ऑनलाइन खरेदी करू शकता किंवा एखादे बिल भरू शकता. मात्र, डेबिट कार्डच्या फसवणुकीचा (Debit Card Fraud) सुद्धा धोका असतो आणि ग्राहकांनी यापासून सतर्क राहिले पाहिजे.

 

डेबिट कार्डद्वारे फसवणूक तेव्हा होते, जेव्हा एखादा अनधिकृत व्यक्ती कार्ड किंवा त्याच्या डिटेलपर्यंत पोहोचतो. यानंतर तो अनेक फसवणुकीचे व्यवहार करू शकतो. ही फसवणूक कशी रोखावी ते जाणून घेवूयात…

 

पिन, CVV लक्षात ठेवा कुणालाही सांगू नका
पिन नेहमी लक्षात ठेवा आणि तो कुणासोबतही शेयर करू नका. लक्षात ठेवा कोणतीही बँक तुमच्याकडे कोणत्याही कारणासाठी पिन मागत नाही. कार्डच्या सीव्हीव्ही नंबरवर सुद्धा ही बाब लागू होते.

 

सीव्हीव्ही तीन अंकाची संख्या असते. डेबिट कार्डच्या पाठीमागे असते. ज्याचा वापर करून ऑनलाइन व्यवहार प्रमाणित केला जातो. यासाठी हा नंबर लक्षात ठेवा आणि शक्य असेल तर कार्डवर सीव्हीव्ही नंबर लपवून ठेवा. (Debit Card Fraud)

स्टेटमेंट मॉनिटर करा, संशयास्पद हालचाली कळवा
कोणत्याही अनोळखी हालचालींसाठी स्टेटमेंट मॉनिटर करा आणि कोणत्याही हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या कार्डचा ताबडतोब रिपोर्ट करा.
याशिवाय, ग्राहकांनी कोणत्याही संशयास्पद व्यवहारावर लक्ष ठेवावे आणि रिपोर्ट करावा.

 

केवळ विश्वसनीय व्यापार्‍यांसाठी कार्डचा वापर करा
ग्राहकांनी केवळ विश्वसनीय व्यापार्‍यांसाठीच कार्डचा वापर करावा आणि शक्य असेल तर कार्डवर लक्ष ठेवावे.
एटीएम रूममध्ये अनोळखी लोकांची मदत घेऊ नका. ट्रांजक्शन पूर्ण केल्यानंतर आपले कार्ड आणि कॅश सुरक्षित करावे.

 

 

Web Title :- Debit Card Fraud | how to prevent debit card frauds know step by step process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

POCSO Court | पोक्सो न्यायालय : विरूद्ध लिंगाचा मित्र असण्याचा अर्थ हा नाही की तो लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे

Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | यूरिक अ‍ॅसिडचा स्तर कमी करण्यासाठी मदत करू शकते व्हीटग्रास, वेटलॉसमध्ये सुद्धा लाभदायक

Earn Money | नोकरी सोडून तुम्ही सुरू करू शकता ‘हा’ सुपरहिट बिझनेस, दरमहा आरामात होईल 5-10 लाखांची कमाई; जाणून घ्या कशी

Ajit Pawar | लाॅकडाऊनबाबत अजित पवारांची अधिवेशनादरम्यान महत्वाची माहिती; नियमाबाबत आमदारांचेही टोचलं कान