डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शनिवार पेठेतील मातृ मंदिर संस्कार केंद्राकडून दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मातृ मंदिर संस्कार केंद्र २, शनिवार पेठ येथे दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा सूरु झाल्याच नाहीत. दरवर्षी सर्व सण शाळेत विद्यार्थ्यांनसमवेत साजरे केले जातात, परंतु यावर्षी ऑनलाईन पद्धतीने सण साजरे केले गेले. दिवाळी हा वर्षातील सर्वांत मोठा सण असून यावर्षी बालदिन ही दिवळीतच येत आहे. मुलं शाळेत येत नसली तरीही शाळा मुलांच्या आनंदात सहभागी व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना आकाशकंदील, पणत्या, उटणे व भेटकार्ड असे देण्यात आले.

पालकांनी सुरक्षित वावराचे सर्व नियम पाळून शाळेत येऊन भेटवस्तू घेतल्या. शाळेने हा उपक्रम घेतल्याने पालकही आनंदित झाले. कार्यक्रमाची संकल्पना शाला समिती अध्यक्ष Adv. अशोक पलांडे आणि इतर सदस्यांची होती. पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांनी सर्व आयोजन केले तर शिक्षकांनी विशेष मेहेनत घेतली.