पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Deccan Pune Crime News | कर्वेरोडवरील बंगल्याची (Karve Nagar Banglow) खिडकीचे गज वाकवून चोरट्याने घरातील 13 लाख 84 हजार रुपये किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने चोरून नेले होते (House Burglary In Karve Nagar). ही घटना 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता उघडकीस आली होती. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक करुन 48 तासात गुन्हा उघडकीस आणून 17 लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime Branch)
अल्लाबक्ष महंमद पीरजादे (वय-35 रा. रेल्वे भराव, मंगळवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 84 वर्षीय ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. मध्यवस्तीत गुन्हा घडल्याने वरिष्ठांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार युनिट एकची दोन पथके तयार करण्यात आली होती.
पथकाचे पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपास असताना पोलीस अंमलदार निलेश साबळे व दत्ता सोनवणे यांना हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार अल्लाबक्ष पीरजादे याने केल्याचे समजले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की, बंगल्याच्या कंपाउंड भिंतीवरुन आत प्रवेश करुन खिडकीचे गज लोखंडी पाईपने वाकवून बंगल्यात प्रवेश केला. कात्रीच्या सहाय्याने कपाटाचे लॉक तोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. चोरलेले दागिने व पैसे शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या जिन्यालगत नदी पात्रात एका दगडाखाली लपवून ठेवले आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन 20 तोळे वजनाचे हिरेजडीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 17 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला डेक्कन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर,
पोलीस अंमलदार निलेश साबळे, दत्ता सोनवणे, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, महेश बामगुडे,
आण्णा माने, राहुल मखरे, अय्याज दड्डीकर, प्रफुल शेलार रुक्साना नदाफ यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Lonikand Pune Crime News | पुणे: इंन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज, क्लासला जाताना पाठलाग अन् शिवीगाळ;
तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांवर पोक्सोचा गुन्हा
Pune Rural Police | लोणावळा: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून गांजाची तस्करी करणारी टोळी गजाआड;
48 किलो गांजासह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)