डेक्कन क्वीन, प्रगती, सिंहगड, इंटरसिटी एक्सप्रेस १६ ऑगस्टपर्यंत रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पावसाची सुरु असलेली संततधार आणि खंडाळा घाटात कोसळणाऱ्या दरडी यामुळे पुणे -मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक गेल्या १५ दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या येत्या शुक्रवार १६ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या  चाकरमान्यांचे मोठे हाल होणार असून त्यांना कामाला दांडी मारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

याशिवाय अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर शहरातील पूर परिस्थितीमुळे महालक्ष्मी एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई -गदग -मुंबई, पुणे – भुसावळ -पुणे एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईला जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यापर्यंत धावणार आहे तर, काही गाड्या कासारा, मनमाड, दौंड मार्गे वळविण्यात आल्या आहेत. पनवेल -नांदेड एक्सप्रेस १० व १२ ऑगस्टला पुण्यातून धावणार आहे तर, पनवेल -नांदेड विशेष गाडी ११ ऑगस्टला सोडण्यात येणार आहे.

निजामुद्दीन वास्को ही गाडी पनवेल, रोहा, मडगाव मार्गे वळविण्यात आली आहे. अहमदाबाद – पुणे दुरोंतो एक्सप्रेस, इंदौर -पुणे एक्सप्रेस आणि अजमेर म्हैसुर एक्सप्रेस या तीन गाड्या सुरत, जळगाव, मनमाड, दौंडमार्गे वळविण्यात आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त