डेक्कन क्वीन, सिंहगड, इंटरसिटी एक्सप्रेस 18 ऑगस्टपर्यंत रद्द, रेल्वे प्रशासनाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे -मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक गेल्या १५ दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या 18 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या  चाकरमान्यांचे मोठे हाल होणार असून त्यांना कामाला दांडी मारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

याशिवाय अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर शहरातील पूर परिस्थितीमुळे चांगलाच फटका बसला आहे.

मुंबईला जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यापर्यंत धावणार आहे तर, काही गाड्या कासारा, मनमाड, दौंड मार्गे वळविण्यात आल्या होत्या. आगामी 2 दिवस रेल्वे सेवा चालू होणार नाही. आरक्षण देखील रद्द करण्यात आले आहे अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like