गोकुळ ‘मल्टिस्टेट’ करण्याचा निर्णय रद्द !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकूळ) इतर राज्यांमध्ये विस्तार करण्याचा म्हणजेच दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा सत्ताधारी गटाचा वादग्रस्त निर्णय अखेर संचालक मंडळाने रद्द केला आहे. याबाबत गोकूळचे चेअरमन रविंद्र आपटे यांनी एक पत्रक काढून माहिती दिली आहे.

 

पत्रकाव्दारे नेमंक काय सांगितलंय हे वाचा –

बाजारपेठेतील गोकुळची विश्वासार्हता, त्यामुळे निर्माण झालेली दुध आणि दुग्धजन्य उत्पादनांची वाढती मागणी यासाठी दुधाचे संकलन वाढवण्याची आणि बाजारपेठेचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे केले तरच भविष्यकाळात शेतकर्‍यांच्या दुधाला अधिक चांगला दर देता येणार आहे. या सर्वांचा विचार करून आपण गोकूळ मल्टीस्टेट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. असे असले तरीही मल्टीस्टेट विषयी दुध उत्पादक शेतकरी आणि संस्थांच्या भावना लक्षात घेवून सेंट्रल रजिस्टारकडे नोंदणीकरीता पाठविलेला मल्टीस्टेटचा प्रस्ताव सद्या रद्द करण्यात येत आहे.

 

Visit : Policenama.com