home page top 1

डीएसके, हेमंती कुलकर्णी यांचा जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हे गेले अनेक दिवस न्यायालयीन कोठडीत आहेत. डीएसके आणि पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला.

डीएसके आणि त्यांच्या पत्नी यांनी विविध मार्गांनी आतापर्यंत तीन हजार कोटी रुपये जमा केल्याचे आणि त्यापैकी चोवीसशे कोटी रुपये इतरत्र वळवल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकले.डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा जामीन फेटाळल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता त्यांच्या गुंतवणूकदारांचे काय हा प्रश्न कायम आहे.

 

Loading...
You might also like