गतिमंद मुलांना ऑनलाइन शिक्षणाबाबत लवकरच निर्णय : सुपाते

पुणे : प्रतिनिधी –  कामायनी संस्था गेली ५५ वर्षे मतिमंद मुलांच्या शिक्षण,व्यवसाय प्रशिक्षण व पुनर्वसन या कामी कार्य करीत आहे. संस्थेच्या संस्थपिका कै. श्रीमती सिंधुताई जोशी यांनी त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरात सन १९६४ रोजी दोन मुलांना घेऊन संस्था सुरू केली होती. सध्याच्या कोरोनां विषाणूजन्य परिस्थितीत दिव्यांग मुलांच्या ऑनलाईन शिक्षण व प्रशिक्षण याबाबत आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य यांनी कार्य सुरू केले आहे. कामायानी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त श्रीमती श्रीलेखा यांचे या संस्थेच्या कामासाठी सतत मार्गदर्शन मिळाले, असे कामायनी उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कालिदास सुपाते यांनी सांगितले.

शालेय शिक्षण ६ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांना दिले जात आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शिक्षणासाठी दिशा प्रकल्प शासनाने सुरू केला आहे. त्यासाठी शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षणही सुरू केले आहे.

पुणे शहरात मतिमंद मुलांचे शासन मान्य तीन व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहेत. यामध्ये कामायनी उद्योग केंद्र गोखलेनगर , दिलासा कार्यशाळा व जीवनज्योत कार्यशाळा यांचा समावेश आहे. गोखलेनगरमधील कामायनी उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कालिदास सुपाते, दिलासा कार्यशाळेच्या व्यवस्थापिका श्रीमती मेघना जोशी, जीवनज्योत कार्यशाळेच्या प्रभारी व्यवस्थापक आनंद अडसूळ, कामायनी संस्थेचे चेअरमन डॉ. आशुतोष भूपटकर व सेवासदन संस्थेचे कार्यवाह चिंतामणी पटवर्धन यांच्या उपस्थित ऑनलाईन बैठक झाली. यावेळी पुढील विषयावर चर्चा करण्यात आली.

प्रत्येक पालकांकडे स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे. मात्र असे स्मार्ट फोन प्रत्येक पालकांकडे असण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे हे स्मार्ट फोन सरकारने उपलब्ध करून द्यावेत. निदेशक / शिक्षक व पालकांना प्राथमिक ऑनलाइन प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. हे ऑनलाइन प्रशिक्षण किमान तीन दिवसांचे असावे. कार्यशाळेत जे प्रशिक्षण दिले जाते व उत्पादन केले जाते ते ऑनलाईन प्रशिक्षणातून पालकांना घरी करून घेणे अवघड आहे. मात्र, त्याच्या घरी उपलब्ध साहित्यातून पालकांनी निदेशक / शिक्षक यांच्या मदतीने प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणे. सर्व विदयार्थ्यंना हॅन्ड सॅनिटायझर ,मास्क वापर, सोशल डिस्टंसिंग चे पालन व ठराविक वेळेनंतर हॅन्ड वॉशचा वापर करून हात स्वच्छ करण्यास प्रशिक्षण देणे .

आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून परवानगी घेऊन व पालकांच्या सहकार्याने बॉर्डर लाइनचे विदयार्थी किंवा जे प्रत्यक्ष निदेशांकांच्या मार्गदर्शनाखाली वस्तूंचे उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतील. जे पालक आपल्या पाल्यास स्वतः कार्यशाळेत ने-आण करू शकतील अश्या विदयार्थ्यंना योग्य ती काळजी व खबरदारी घेऊन कार्यशाळेत बोलवावे . तीव्र मतिमंदत्व व मंगोल मुलांना बोलावण्यात येऊ नये.

टेम्प्रेचर गन, हॅन्ड्स फ्री सॅनिटायझर मशीन, हँडग्लोज, व ठराविक कालावधी नंतर औषध फवारणी करून घ्यावी. पाककृती चे प्रत्यक्ष प्रशिक्षण पालकांनी आपल्या मार्गदर्शनाखाली पाककला व्यवसाय प्रशिक्षण जरूर दयावे, असे कालिदास सुपाते यांनी दिली.