राजीनामा देण्याचा निर्णय एकनाथ खडसेंचाच : मुख्यमंत्री

Advt.

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ खडसे यांच्यावर एमआयडीसी प्रकरणात जेव्हा आरोप झाले, त्यावेळी विरोधकांनी रान उठवले होते. विरोधकांना खडसे आणि आम्ही उत्तर दिले. एकनाथ खडसे त्यावेळी मला येऊन भेटले आणि चौकशी करा तोपर्यंत मी राजीनामा देतो, असे स्वत: म्हणाले होते. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. विचारपूर्वक निर्णय घ्या म्हणून मी त्यांना त्यावेळी सांगितले होते, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.

एकनाथ खडसे  १९९० पासून विधानसभेवर निवडून जात आहेत. दरम्यानच्या काळात खडसे यांनी अर्थमंत्री आणि पाटबंधारे मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. राज्यातील भाजपच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. मात्र तेच खडसे भाजपकडून गेल्या कित्येक दिवसांपासून उपेक्षीत आहेत.

२०१४ मध्ये महसूलसह इतर खात्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा खडसे यांना द्यावा लागला होता. त्यानंतर खडसे यांनी अनेकवेळा नाराजी बोलून दाखवली. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहीले, म्हणून अनेकांची झोप उडाली असे त्यांनी एका कार्य़क्रमात बोलून दाखवले होते.

एमआयडीसी घोटाळ्या बरोबर अनेक आरोप खडसेंवर करण्यात आले होते. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावरुन विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे खडसे यांनी राजीनामा देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून दबाव आणला गेला. मात्र, खडसे यांनी स्वत: राजीनामा दिल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.