10 वी, 12 वीच्या परिक्षेचे अंतिम ‘वेळापत्रक’ जाहीर, जाणून घ्या तारखा

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – बऱ्याच दिवासांपासून 10 वी, 12 वीचे विद्यार्थी परिक्षेच्या तारखांची वाट पाहत होते, आज अखेर 10 वी, 12 वीच्या बोर्डाच्या परिक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे. 10 वीच्या परिक्षा मार्च महिन्यात असून 12 वीच्या परिक्षा फेब्रुवारी महिन्यात असतील.

यंदाची 10 वीची बोर्डाची परिक्षा 3 मार्च 2020 पासून सुरु होणार आहेत ही परिक्षा 23 मार्च 2020 पर्यंत सुरु राहील. तर 12 वीच्या बोर्डाच्या परिक्षा फेब्रुवारी महिन्यात 18 फेब्रुवारी 2020 पासून 18 मार्च 2020 दरम्यान होतील.

10 वीची परिक्षा यंदा 3 मार्चपासून सुरु होतील, आज हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. 10 वीच्या विद्यार्थांच्या हातात आता अभ्यासासाठी काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आता अभ्यासासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like