‘सुपरस्टार’ नागार्जुनच्या शेतात सापडला सडलेला मृतदेह, प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाईन –  साऊथचा सुपरस्टार नागार्जुन याच्या शेतात एक सडलेल्या अवस्थेतला अज्ञात मृतदेह सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. नागार्जुन याची पापीरेड्डीगुडा या गावात ४० एकर जामीन आहे. या जमीनीत एक मृतदेह सापडला आहे.
नागार्जुनच्या शेतात सापडला एक सडलेला मृतदेह 
तसं ह्या जामिनीचा बऱ्याच काळापासून वापर होत नव्हता. जमीन अशीच पडून होती. मिळालेल्या बातमीनुसार नागार्जुनची बायको नुकतीच आपल्या या शेतात गेली होती. या जमिनीच्या काही शेतकरी काम करत होते. त्यांना या मृतदेहाचा वास आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
कुटुंब या प्रकरणाबाबत अनभिज्ञ 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह इतका सडला आहे की, तो ओळखणे सुद्धा अतिशय कठीण आहे. एवढे मात्र स्पष्ट आहे की हा मृतदेह एखाद्या पुरुषाचा आहे.  आणि या मृत्यूला जवळजवळ ४ किंवा ६ महिने झाले असावेत. या बाबत अद्याप नागार्जुन यांच्या परिवाराकडून कसलेही विधान करण्यात आलेले नाही.

visit: Policenama.com