Suicide News | खाणावळ चालवणार्‍या दांपत्याची आत्महत्या, दोघांचे मृतदेह आढळले कुजलेला अवस्थेत

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Suicide News |खाणावळ चालवणार्‍या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide ) केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात (Chandrapur) घडली आहे. चंद्रभान दुबे (60), मंजू दुबे (50) रा. टॉवर टेकडी अशी त्यांची नावे आहेत. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. या दाम्पत्याने कोरोना काळात व्यवसाय डबघाईला आल्याने आर्थिक तंगीतून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

चंद्रभान दुबे व मंजू दुबे या दाम्पत्याचे चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर ममता भोजनालय आहे सोमवारी काही नागरिक फिरायला गेले असताना त्यांना भोजनालयातून दुर्गंधी येऊ लागली. काही लोकांनी भोजनालयात डोकावून पाहिले असता चंद्रकांत दुबे हे खाली पडलेल्या अवस्थेत तर त्यांची पत्नी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवण्यात आले. दोघांनी दोन ते तीन दिवसापूर्वी आत्महत्या केली असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोरोनामुळे शैक्षणिक संस्था आणि कार्यालये बंद असल्याने त्यांची खाणावळ डबघाईला आल्याने आर्थिक तंगीतून दाम्पत्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे.

Web Title :   Suicide News | decomposted body found bhojanalay director couple commits suicide

Pune-Bangalore Highway | शुक्रवारपासून बंद असलेली पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक आज सुरु होण्याची शक्यता

Ration Card वर मिळतील अनेक फायदे, जर अजूनपर्यंत बनवले नसेल तर ‘या’ पध्दतीनं करा अर्ज, जाणून घ्या

Post Office च्या ’या’ योजनेत फक्त 1,000 रुपये जमा करा आणि दरमहिना 4,950 रुपये मिळवा !

Pune Crime | कोंढव्यात हुक्का पार्लरवर छापा, मालकासह मॅनेजरविरुद्ध FIR

Dhule Crime | धक्कादायक ! पती आणि मुले बाहेर असताना पत्नीचा धारदार शस्त्राने खून, प्रचंड खळबळ

Maharashtra Corona Vaccination | कोरोना लसीकरणात राज्याची पुन्हा थक्क करणारी कामगिरी, मिळवले ‘हे’ यश, जाणून घ्या

Maharashtra Police News | दुर्देवी ! जेवताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू