2 अतिरेक्यांसह DSP ला अटक, कारमध्ये सापडले 5 ‘ग्रेनेड’ !

श्रीनगर : वृत्तसंस्था – अतिरेक्यांशी पोलिस व लष्कर काश्मीर घाटीत निकराचा लढा देत असतानाच पोलीस अधिकारी थेट अतिरेक्यांबरोबर एकाच कारमधून फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लष्कर आणि हिजबुल या अतिरेकी संघटनेशी संबंधित दोघा अतिरेक्यांबरोबर असणाऱ्या  एका डीएसपीला पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना दक्षिण काश्मीरमधील कुलग्राम जिल्ह्यामध्ये घडली. अटक करण्यात आलेल्या डीएसपीची नेमणूक श्रीनगर अंतरराष्ट्रीय विमानतळावर होती.

नेहमीप्रमाणे पोलीस आणि लष्कर हे येणाऱ्या  जाणाऱ्या  वाहनांची चेकिंग करीत होते. त्यावेळी एका कारमध्ये दोघा अतिरेक्यांबरोबर हा पोलीस अधिकारीही होता. गाडीच्या चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. चेकिंगमध्ये गाडीत पाच ग्रेनेड ही सापडली आहेत. या अतिरेक्यांपैकी एक जण लष्करचा आणि दुसरा हिजबुलचा असल्याचे सांगितले जाते.

अतिरेकी कमांडर सैयद नबीद बाबू दक्षिण काश्मीरमधील कमांडरांपैकी एक आहे. ट्रकचालक आणि स्थानिक लोकांची हत्या करण्यामध्ये तो सहभागी होता. नबीद बाबू हा पूर्वी पोलीस शिपाई होता. दोन वर्षांपूर्वी एफसीआय च्या गोदामावर नबीद याची नेमणूक करण्यात आली होती. त्यावेळी तो हत्यारे घेऊन फरार झाला व अतिरेकी संघटनेत सहभागी झाला होता.

अतिरेक्यांच्या बरोबर असलेल्या  हा डिएसपी अतिरेक्यांबरोबर कसा काय जात होता. त्यातील ग्रेनेड कशी आली याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. पोलिसांनी याबाबत कोणीही माहिती अधिकृतपणे दिलेली नाही.
फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/