पुण्याच्या मोर्या ग्रुपने ‘तिरंग्या’ने सजविला विठुरायाच्या गाभारा 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आज देशभरात १५ ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही स्वातंत्र्य दिनानिमित्त फुलांच्या सहाय्याने तिरंगाची सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या या सजावटीचे काम पुण्यातील मोर्या ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

देवाचा गाभारा, चौखांभी मंडप, सोलखांभी मंडप, आकर्षक भगव्या, पांढऱ्या, हिरव्या पाना फुलांनी सजविला आहे. तर श्री विठ्ठल रुक्मिणीला तिरंगा शेला घातल्याने देवाचे रुप आणखीन खुलून दिसत आहे. विविध सणानिमित्त मंदिरात फुलांची सजावट गेल्या काही वर्षांपासून करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सणानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांना वेगळे समाधान या सजावटीमुळे मिळू लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –