जेजुरीत नगरपालिकेकडून विकास कामांचे लोकार्पण

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) –  जुनी जेजुरी, लक्ष्मीनगर, साठेनगर, घडशी आळी या परिसरातील पालिकेच्या वतीने केलेल्या सुमारे तीन कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. जुनी जेजुरी येथील चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटनेते सचिन सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष सदाशिव बारसुडे, माजी विश्वस्त सुनील आसवलीकर नगरसेवक गणेश शिंदे, महेश दरेकर, अजिंक्य देशमुख, बाळासाहेब सातभाई, सुंदर खोमणे, उद्योजक रवी जोशी, विशाल बारसुडे, सुशील राऊत, नगरसेविका सविता जगताप, रुक्मिणी जगताप, माजी नगरसेविका लता दोडके, स्वाती मावळदकर, दिगंबर उबाळे, सुरेश उबाळे उपस्थित होते.

परिसरात झालेल्या विकासकामांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांचे मार्गदर्शन व नगरसेवकांची साथ यामुळे जुनी जेजुरी परिसरात मोठया प्रमाणावर विकास कामे झाल्याचे नगराध्यक्षा सोनवणे यांनी सांगितले. जुनी जेजुरीतील सर्वच नगरसेवक विविध विकासकामांसाठी सतत पाठपुरावा करीत असल्याचे बारसुडे यांनी सांगितले. जुनी जेजुरी परिसरात डांबरी रस्ते, पथदिवे, बंदिस्त गटारे, जलवाहिनी टाकणे ही कामे झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक सदाशिव बारसुडे, विश्वस्त संदीप जगताप, सुनील आसवलीकर, रामभाऊ उबाळे यांची भाषणे झाली. चंद्रकांत घाडगे यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब काळे यांनी सूत्रसंचालन केले.

Visit – policenama.com 

You might also like