राकेश टिकैत यांचं मोठं विधान, म्हणाले – ‘दीप सिध्दू हा भाजपाचा कार्यकर्ता, पंतप्रधानांसोबत त्याचा फोटो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  प्रजासत्ताक दिनी राजधानीत शेतकऱ्यानी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामागे दीप सिद्धू असलीच समोर आले आहे. दीप सिद्धू हा भाजपा कार्यकर्ता असून, त्याचे पंतप्रधानांबरोबर फोटो असल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हंटल आहे. तर दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे सर्वजण थक्क झाले आहे. या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाबरोबरच ८६ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, आतापर्यंत १५गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. तर, ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज व शेतकरी संघटनांचे झेंडे फडकवले.

यासंदर्भात बोलताना शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणले की, दीप सिद्धू हा शीख नसून तो भाजपाचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधानांसोबत त्याचा फोटो देखील आहे. ही शेतकर्‍यांची चळवळ आहे आणि तशीच राहील. काही लोकांनी त्वरित हे ठिकाण सोडले पाहिजे – ज्यांनी बॅरिकेडिंग तोडली ते कधीच आंदोलनाचा भाग होणार नाहीत. तसेच, शेतकरी आंदोलनात हिंसाचाराद्वारे अडथळे आणण्याचा प्रयत्न करणारे लोक कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखतो, त्यांची ओळख पटलेली आहे. हे सर्वजण राजकीय पक्षाचे लोक असून आंदोलनाला बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे, असं राकेश टिकैत म्हणाले होते.