पोलीसनामा ऑनलाईन : Deepa Parab Chaudhari | दीपा परब एक प्रख्यात अभिनेत्री असून प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी आहे. दीपा परब चौधरी हिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांना आपलसं केलं. अंकुश आणि दीपाच्या लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2007 ला या दोघांनी लग्न केलेलं. या दोघांना प्रिन्स हा मुलगा आहे. दीपा परब ही दामिनी या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्यानंतर ती थोडा काळ दीपा सगळ्या प्रकाशझोतापासून दूर होती. (Deepa Parab Chaudhari)
आता झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून अभिनेत्री दीपा परब- चौधरी जवळपास दहा वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. या मालिकेत ती अश्विनी या गृहिणीच्या व्यक्तिरेखेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. दीपाने ‘तू चाल पुढं’मधील भूमिकेने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. (Deepa Parab Chaudhari)
यानिमित्ताने दीपाने अनेक मुलाखती दिल्या.
त्यातीलच एका मुलाखतीमध्ये दीपाला विचारण्यात आलं की “जस मालिकेतील अश्विनी भाजी आणायला जाते
तसं दीपा परब भाजी आणायला जाते का आणि बार्गेनिंग करतेस का?” त्यावर दीपाने उत्तर दिले “हो,
मला आवडतं भाजी आणायला मात्र आता कामामुळे मी भाजी आणायला जात नाही.”
पुढे “तू कोणाला प्रपोज केले आहे का?” असे विचारले तेव्हा ती म्हणाली, “नाही मी कुणाला प्रपोज नाही केलं
पण मला सचिन तेंडुलकरला प्रपोज करायच होतं. तो माझा क्रश होता.
माझ्या नवऱ्याने एक कार्यक्रम केला होता तेव्हा मी सचिन तेंडुलकरच्या बाजूला बसले होते.” अशी प्रतिक्रिया तिने दिली.
Web Title :- Deepa Parab Chaudhari | marathi actress ankush chaudhary wife deepa said that sachin tendulkar was her crush
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nysa Devgan | लाल रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये न्यासा दिसते एकदम हॉट