Deepak Chahar | भारतीय संघाला मोठा धक्का ! CSK चा 14 कोटींचा मोहरा T-20 विश्वचषकालाही मुकण्याची शक्यता!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Deepak Chahar |  आयपीएलचा 15 (IPL Season 15)  हंगाम सुरू झाला असून आता प्रत्येक संघाने चार-चार सामने खेळले आहेत. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा खेळाडू दीपक चहर (Deepak Chahar)  मात्र आता आयपीएलमध्येच नाही तर टी-20 विश्वचषकामध्येही तो खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे भारतीय संघालाही (Indian Team) मोठा धक्का बसला आहे.

 

दीपक चहरला (Deepak Chahar) आता जवळपास चार महिने मैदानापासून लांब राहावं लागणार आहे. त्यामुळे दीपक चहर  हा यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये दिसणार नाही हे स्पष्ट आहे. पण आता टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) त्याचा समावेश करणेही अवघड जात आहे. चेन्नई सुपर किंग्ज  तसेच टीम इंडियासाठीला पर्यायी गोलंदाज पाहावा लागणार आहे.

 

या वेळी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होत असून वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर चांगली छाप सोडली आहे.
अशा परिस्थितीत टीम इंडियासोबत दीपक चहरची अनुपस्थिती हा मोठा धक्का आहे.
आता रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) त्यांच्या बी प्लॅनवर कसे काम करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, आयपीएलबद्दल बोलायचं झालं तर चेन्नई सुपर किंग्जला
आता पॉवरप्लेमध्ये विकेट्स मिळवून देणारा असा गोलंदाज पाहावा लागणार आहे.
कारण दीपक हा प्रतिस्पर्धी संघाचे सुरूवातीला बळी मिळवून देण्यासाठी चेन्नई संघाला उपयुक्त ठरत होता.
मात्र आता दीपक खेळणार नसल्यामुळे चेन्नईसाठी मोठा धक्का आहे.
चेन्नईने सलग चार सामने गमावले असून विजयासाठी त्यांना पाचव्या सामन्याची वाट पाहावी लागली.

 

Web Title :- Deepak Chahar | deepak chahar injury update chennai super kings ipl 2022 ms dhoni

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा