Deepak Kesarkar | ‘…तर राष्ट्रवादीचेही येत्या निवडणुकीत दोन तुकडे करा,’ दीपक केसरकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – ज्या राष्ट्रवादीकडून कपटनितीने शिवसेनेचे (Shivsena) दोन तुकडे करण्यात आले, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे येत्या निवडणुकांत दोन तुकडे करा. असा सल्ला मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी कोल्हापूर येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कागल तालुक्यातून निवडूण आलेल्या नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) बोलत होते.

यावेळी कोल्हापूर मधील पाचही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार निवडून आणून राष्ट्रवादीचे दोन तुकडे करावे. असा घणाघात मंत्री दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला. यावेळी खासदार संजय मंडलीक (MP Sanjay Mandlik), आमदार प्रकाश आबीटकर (Prakash Abitkar), सुजित चव्हाण (Sujit Chavan), विरेंद्र मंडलीक (Virendra Mandlik) आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री दीपक म्हणाले की, मी किती काळ पालकमंत्री पदावर राहिल माहित नाही. येत्या सहा महिन्यात मात्र कोल्हापूरचे नाव आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन दाखवू. अशी ग्वाही देखील यावेळी बोलताना त्यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी कोट्यावधीचा निधी दिला आहे. कोणीही पैशाला विकला जात नाही, जे लोकांना प्रेम देतात, त्यांच्या मागे जनता उभी राहते. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) करत आहेत. असंही यावेळी बोलताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

यावेळी बोलताना खासदार संजय मंडलीक म्हणाले की, आम्हाला पूर्वी निधी मिळत नव्हता.
आम्ही सत्तेवर आल्यापासून आम्हाला निधी मिळत आहे.
येत्या काळात कोल्हापूर जिल्हा हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा असेल.
मतदारसंघात निधी खेचून आणून, जनतेला काय पाहिजे हे पाहून लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून काम करायला पाहिजे.
असंही यावेळी बोलताना खासदार संजय मंडलीक म्हणाले.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी ७० कोटींचा निधी मंजूर केला गेल्याची माहिती
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना दिली.

Web Title :-  Deepak Kesarkar | deepak kesarkar attack on ncp over shivsena split in kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Minor Girl Rape Case | मावस भावाकडून 15 वर्षाच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड; मावळमधील घटना

Pune Crime News | मार्केटयार्डातील आंबेडकरनगरात दोन गुंडांच्या टोळ्यांचा राडा; एकमेकांवर कोयता, तलवारीने हल्ला, दोन्ही गटातील ८ जणांना अटक

Namrata Malla | नम्रताच्या हॉट फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Shah Rukh Khan | पठाणच्या रिलीजआधी शाहरुख खानने चाहत्यांना दिले ‘हे’ सरप्राइज