Deepak Kesarkar | ‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’ – दीपक केसरकर

पणजी : वृत्तसंस्था – शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री झाला याबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अनेक मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्या बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं त्यांनी टाळलं. परंतु यावेळी त्यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते आहेत. आम्ही त्यांच्यावर काही बोलणार नाही. योग्य वेळ आली तेव्हा उत्तर देऊ. आम्ही शिवसेनेत आहोत. आमचे मुख्यमंत्री शिवसैनिक आहेत. शाखाप्रमुख आज मुख्यमंत्री झाला आहे, असे केसरकर म्हणाले.

 

शिंदे मुख्यमंत्री होणार हे माहित नव्हते
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नवे मुख्यमंत्री होणार याबाबतची माहिती गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना देखील नव्हती. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत घोषणा केली तेव्हा त्यांना देखील आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रचंड जल्लोष केला. त्याचा व्हिडीओ समोर आला.

 

बदनामी केली जातेय
पण या व्हिडीओवर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर गोव्यात आमदारांनी जल्लोष केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी केली जात आहे. ती आमदारांच्या तणाव कमी झाल्याने नैसर्गिक प्रतिक्रिया होती, असंही दीपक केसरकर यांनी सांगितले. तसेच आता इथून पुढे कसे वागायचे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली.

बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली
सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची इच्छा होती.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हाव, अशी आमची इच्छा होती. पण होतील असं वाटलं नव्हतं.
शिंदेंनी मुख्यमंत्री होणं हा आमच्यासाठी सुखद धक्का होता. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)
आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी पूर्ण केली.
देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मोठं मन दाखवल, असेही केसरकर म्हणाले.

 

Web Title :- Deepak Kesarkar | deepak kesarkar slams uddhav thackeray after new shinde and fadnavis government established in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…

 

RTI मध्ये झाला खुलासा ! अटल पेन्शन योजनेत सर्वात जास्त प्रीमियम देणारे राज्य बनले यूपी, महाराष्ट्र आणि बंगाल मागे नाही

 

Assembly Speaker Election | कोणत्या मुद्याच्या आधारे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे?, काँग्रेसचा सवाल; साधला राज्यपालांवर निशाणा (व्हिडिओ)