Deepak Kesarkar | अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केसरकरांचे स्पष्टीकरण, म्हणाले – एकनाथ शिंदे तेव्हा निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग…

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – Deepak Kesarkar | 2014 साली सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शिवसेनेचे (Shivsena) काही वरिष्ठ नेते हे काँग्रेससोबत (Congress) आघाडी करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते, हे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. कारण त्याकाळात शिंदे हे निर्णय प्रक्रियेतच नव्हते. त्यांना कदाचित शिवसेना पक्षप्रमुखाचा आदेश असेल त्यामुळेच ते तिथे गेले असावेत, असे स्पष्टीकरण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले आहे. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.

 

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, म्हणाले, 2014 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत निर्णय प्रकियेत नव्हते मग ते प्रस्ताव कसा काय घेऊन येतील. आणि कामानिमित्त कोण कोणाला भेटू शकत नाही का. प्रस्ताव देण्याचे काम शिंदे यांनी केले तर तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आदेश असेल. नंतर त्यांनीच काँग्रेस राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस सोबत युती केली हे ही सर्वांनी पाहिले. ते पुढे म्हणाले, कोल्हापूर सारख्या एका शाहूनगरीचा मला पालकमंत्री (Guardian Minister) करण्यात आला हे मी माझे भाग्य समजतो कोल्हापूरचा पर्यटनदृष्ट्या विकास (Tourism Development) करणारच, पण उद्योग व्यवसायातही कोल्हापूर अग्रेसर राहिल यांची काळजी घेतली जाईल.

दसरा मेळाव्याबद्दल (Dasara Melava) माहिती देताना ते म्हणाले, शिंदे गटाचा (Shinde Group) दसरा मेळावा न भुतो ना भविष्यती असा होईल.
एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत.
त्यामुळेमोठ्या संख्येने शिवसैनिक (Shiv Sainik) दसरा मेळाव्यात सहभागी होतील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही हजारो शिवसैनिक मुंबईला येणार आहेत. त्याचे नियोजन ही योग्य प्रकारे सुरू आहे.

 

Web Title :- Deepak Kesarkar | eknath shinde was not in the decision making process then how will he propose deepak kesarkars reply to ashok chavan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | चिठ्ठी आयी है, आयी है…भाषण सुरू असतानाच अजितदादा गुणगुणले गाणं, कार्यकर्त्यांमध्ये हास्यकल्लोळ!

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 5 लाखाचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी पुन्हा राज्याव्यापी आंदोलन करू, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक, सरकारला इशारा