Deepak Kesarkar| शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत मिळणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पाडव्याच्या (Diwali Padwa) मुहूर्तावर शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबत (Books) वह्या देखील (Textbook) मोफत दिल्या जाणार असल्याचे दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) सांगितले.

काही दिवसांपूर्वी 20 पट संख्येपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा राज्य सरकारने (State Government) निर्णय घेतला होता. या शाळेमधील अतिरिक्त (Surplus) शिक्षक आणि मुलांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात येणार होते. त्यामुळे आता अशा शाळांची आणि शिक्षकांची माहिती घेण्यात येत आहे. आणि त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे देखील केसरकरांनी (Deepak Kesarkar) सांगितले होते.

आता शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्य पुस्तकांसोबत वह्या देखील देण्यात येणार आहे, अशी घोषणा केसरकरांनी केली. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे कॅप्टन अशोककुमार खरात (Captain Ashokkumar Kharat) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केसरकर बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) देखील उपस्थित होत्या. कॅप्टन अशोककुमार खरात हे सिन्नर तालुक्यातील शिवनिका संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते ब्रम्हांडशास्त्रज्ञ देखील आहेत.

सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी माणसांना आपल्या पाल्याला वही घेणे देखील अवघड आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याचा तज्ज्ञांनी आणि संबंधितांनी विचार करावा
अशा सूचना दीपक केसरकर यांनी मागे दिल्या होत्या. त्यानुसार आता आम्ही हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील शिक्षकांनी महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा हा उपक्रम म्हणून याकडे पाहावे,
असे आवाहन दीपक केसरकर यांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांनी अमूक एका शाळेत शिक्षण घेतले, तरच त्याची गुणवत्ता वाढते, असे काही नाही.
त्यामुळे त्यांच्या शाळा बंद झाल्या तरी आसपासच्या शाळेत त्यांचे समायोजन होईल.
त्यांना ती शाळा लांब पडत असेल, तर बसची व्यवस्था करण्यात येईल.
कमी मुलांमध्ये शिकण्यापेक्षा मोठ्या वर्गात आणि जास्त मुलांमध्ये शिक्षण घेतले,
तर मुलांचा सर्वांगिण विकास होतो. तसेच या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे इतर शाळेत समायोजन
करण्यात येईल, असे देखील केसरकर यावेळी म्हणाले.

Web Title :-  Deepak Kesarkar| free textbooks along with books from next year education minister deepak kesarkar announced on the occasion of padwa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘ओल्या दुष्काळाचे पार वाटोळे…’, शिंदे-फडणवीसांच्या राज्याच्या दौऱ्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Former MLA Vinayak Nimhan Passed Away | माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन

10 Home Remedies For Dengue Patients | डेंग्यूच्या तापावर घरगुती उपाय : तापासाठी औषधा इतक्या प्रभावी आहेत या 10 गोष्टी, वाढते प्लेटलेट्स काऊंट