Deepak Kesarkar | दिपक केसरकरांचं मोठं विधान; म्हणाले – ‘वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरे भाजपाच्या वरिष्ठांशी बोलले तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Deepak Kesarkar | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. यानंतर शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. सध्या शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान भाजपमध्ये (BJP) सामिल होण्यासाठी शिंदे गटाकडून वेळोवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आवाहन करण्यात येत आहे. याबाबत आणखी एकदा शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) मोठं वक्तव्य केलं आहे.

 

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “उद्धव ठाकरे थोडासा अभिमान बाजूला ठेवून कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलले तर यातून सुवर्णमध्य निघू शकतो अशी माझी भावना आहे,” असं ते एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत. “उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण हा तोडगा महाराष्ट्र स्तरावर नाही तर वरिष्ठ स्तरावरच निघू शकेल.”

 

पुढे केसरकर म्हणाले, “उद्धव ठाकरे धनुष्यबाण चिन्हासंबंधी काय म्हणाले त्यावर मी भाष्य करणार नाही.
पण कुठेतरी अहंकाराच्या पुढे जाऊन कार्यकर्त्यांची भावना जपण्याची ही वेळ आहे.
महाराष्ट्रातील स्तरावर जे काही घडायचं ते घडून गेलं आहे. नवीन सरकार आलं असून त्यांनी काम सुरु केलं आहे.
पण हा वाद संपला पाहिजे अशी भावना प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे.”

दरम्यान, “मला महाराष्ट्राबाहेरील शिवसैनिकांचे वारंवार फोन येत असतात. उद्धव ठाकरेंपासून लांब जाऊ नका अशी भावना ते व्यक्त करत असतात.
काही गोष्टींमध्ये सुवर्णमध्य साधावा लागतो ही गोष्ट खरी आहे,” असं केसरकर म्हणाले.

 

Web Title :- Deepak Kesarkar | maharashtra cm eknath shinde deepak kesarkar uddhav thackeray shivsena bjp narendra modi amit shah

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vasant More | ‘हिंमत असेल तर महापौर जनतेतून निवडून आणा’ – मनसे नेते वसंत मोरे

 

Chhagan Bhujbal | …म्हणून अनेकजण शिवसेनेतून भाजपात गेले – छगन भुजबळ

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर