×
Homeताज्या बातम्याDeepak Kesarkar | शिंदे गटात सामील झालेल्या दीपक केसरकरांना लागली लॉटरी, मुंबईच्या...

Deepak Kesarkar | शिंदे गटात सामील झालेल्या दीपक केसरकरांना लागली लॉटरी, मुंबईच्या पालकमंत्री पदाची मिळाली जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Deepak Kesarkar | महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळ स्थापन होऊन दीड महिना झाला. तरीदेखील पालकमंत्र्यांची (Guardian Minister) यादी जाहीर झाली नव्हती. अखेर शेवटी पालकमंत्र्यांची रखडलेली यादी काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केली. 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर 9 ऑगस्ट रोजी भाजपच्या (BJP) 9 तर शिंदे गटाच्या (Shinde Group) 9 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. तेव्हापासून पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. अखेर शेवटी काल पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली. (Deepak Kesarkar)

 

यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक म्हणजेच नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे. या सगळ्यांत एकनाथ शिंदे गटाची भूमिका परखडपणे मांडणारे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना लॉटरी लागली आहे. त्यांच्याकडे मुंबई शहराचे व कोल्हापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे
राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) – अहमदनगर (Ahmednagar), सोलापूर (Solapur)

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) -चंद्रपूर (Chandrapur),गोंदिया, (Gondia)

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)- पुणे (Pune)

विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit) – नंदुरबार (Nandurbar)

गिरीश महाजन (Girish Mahajan) – धुळे (Dhule),लातूर (Latur), नांदेड (Nanded),

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) – बुलढाणा (Buldhana), जळगाव (Jalgaon)

दादा भुसे (Dada Bhuse) – नाशिक (Nashik),

संजय राठोड (Sanjay Rathod) – यवतमाळ (Yavatmal), वाशिम (Washim)

सुरेश खाडे (Suresh Khade)- सांगली (Sangli)

संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) -औरंगाबाद Aurangabad (छत्रपती संभाजीनगर-Chhatrapati Sambhajinagar)

उदय सामंत (Uday Samant) – रत्नागिरी (Ratnagiri), रायगड (Raigad)

तानाजी सावंत (Tanaji Sawant) -परभणी (Parbhani), उस्मानाबाद Osmanabad (धाराशिव-Dharashiv)

रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) – पालघर (Palghar), सिंधुदुर्ग (Sindhudurg)

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) – हिंगोली (Hingoli)

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) – मुंबई शहर (Mumbai City), कोल्हापूर (Kolhapur)

अतुल सावे (Atul Save) – जालना (Jalna), बीड (Beed)

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) – सातारा (Satara), ठाणे (Thane)

मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) -मुंबई उपनगर (Mumbai Suburb)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) – नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), अमरावती (Amravati), अकोला (Akola), भंडारा (Bhandara), गडचिरोली (Gadchiroli)

 

Web Title :- Deepak Kesarkar | maharashtra guardian ministers list declared by cm eknath shinde deepak kesarkar gets mumbai devendra fadnavis to look after 6 districts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | आमदार माधुरी मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा

Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News