Deepak Kesarkar | आम्ही शिवसैनिकच ! ‘त्या’ 14-15 आमदारांना शिंदे गटासोबत यावं लागेल, दिग्गज बंडखोर नेत्याने सांगितली रणनीती

गुवाहाटी : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | आम्ही शिवसैनिकच आहोत आणि शिवसेनेतच आहोत याचा पुनरुच्चार शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा देण्यापेक्षा काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीने (NCP) सत्तेतून बाहेर पडावं. आपण भाजपसोबत (BJP) निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत जावं. राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार यावं आणि हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानं व्हावं, हीच आमची इच्छा असल्याचे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. केवळ 14-15 आमदार सध्या आमच्यासोबत नाहीत. पंरतु त्यांना आमच्या सोबत यावं लागेल. आम्ही काढलेला व्हिप त्यांना मानावा लागेल. कारण आमचा गट मोठा आहे. गटनेते एकनाथ शिंदे आहेत, असेही केसरकर यांनी सांगितले. आमचा गट म्हणजे शिवसेना असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी पुढे जात असून हिंदुत्वाच्या (Hindutva) मार्गानं मार्गक्रमण करत असल्याचे केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

 

आता तुमचे नेते कोण? एकनाथ शिंदे की बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)? या प्रश्नावर बोलताना केसरकर म्हणाले,
ठाकरेसाहेब पक्षाचे प्रमुख आहेत. ते आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आजही आम्हाला आदर आहे.
विधिमंडळात आमचे नेते शिंदे आहेत, असे उत्तर त्यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रसमधील काही जण आता उद्धव ठाकरे यांचे सल्लागार झाले असून त्यांनी दिलेले सल्ले ठाकरे साहेबांना महत्त्वाचे वाटतात, याचे दु:ख वाटत, असं केसरकर यांनी सांगितलं.

या गटातील काहींना फोडण्याचे प्रयत्न झाले, असेही केसरकर यांनी सांगितले. आताही आम्ही हिंदुत्वाच्या मार्गाने पुढे जाण्याची मागणी करत आहोत.
तर आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे. मजूत काढण्याऐवजी धमक्या दिल्या जात आहेत.
पातळी सोडून टीका केली जात असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

 

Web Title :- Deepak Kesarkar | maharashtra political crisis we have majority 14-15 mlas who are with uddhav thackeray have to follow whip says deepak kesarkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या ‘फुटी’ मागील खरे कारण पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समोर येणार?

 

Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन बोलावून अविश्वास ठराव आणता येणार नाही’ – घटनातज्ज्ञ

 

Pune PMC News | मिळकत कराची थकबाकी असलेल्या 121 मिळकती दिवसभरात सील; 24 मिळकत धारकांनी तातडीने भरले 45 लाख रुपये