Deepak Kesarkar | शिवसेना प्रत्येकवेळी शरद पवारांमुळे फुटली, दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या (Presidential Election) पार्श्वभूमीवर एनडीएच्या (NDA) बैठकीसाठी शिंदे गटाला (Shinde Group) आमंत्रण देण्यात आले आणि यासाठी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) सध्या दिल्लीत आहेत. यावेळी दीपक केसरकरांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत काही गौप्यस्फोट केले आहेत. शिवसेना (Shivsena) आजवर ज्या ज्या वेळी फुटली त्यामागे शरद पवारांचाच (Sharad Pawar) हात होता असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी एका घटनेचाही आवर्जून उल्लेख केला. तसेच राष्ट्रवादीकडून (NCP) राज्यात कसं शिवसेनेला संपवण्याचं कारस्थान सुरु आहे याची माहिती दिली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, आजपर्यंत राज्यात शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली आहे, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचा हात आहे. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी शिवसेना का फोडली ? बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) जिवंत असताना त्यांना यातना का दिल्या, याचं उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावं, असेही केसरकर यांनी म्हटले.

 

उद्धव ठाकरे यांना चुकीच्या नेत्यांकडून मार्गदर्शन

शिवसेनेतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने राज्यपालांना (Governor) शिंदे – फडणवीस सरकार (Shinde – Fadnavis Government) बेकायदा असल्याचे पत्र दिलं आहे. यामध्ये मंत्र्यांना शपथ दिली जाऊ नये, असे म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चुकीच्या नेत्यांकडून मार्गदर्शन होत आहे, असे मला वाटते. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असे मत केसरकर यांनी मांडले.

 

शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते

शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले होते. नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती.
परंतु नारायण राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती, असेही पवारांनी सांगितल्याचा दावा केसरकर यांनी केला.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना स्वत: शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पाठिशीही शरद पवार यांचे आशीर्वाद होते.
कारण, शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
त्यामुळे आता यावर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कसे प्रत्युत्तर देतात हे पहावे लागेल.

 

शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही

‘मातोश्री’ (Matoshri) कधीही ‘सिल्व्हर ओक’ च्या (Silver Oak) दारात गेल्याचं मी पाहिलेलं नाही.
बाळासाहेबांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं कधीही मान्य नव्हते.
माझ्या पक्षात मी शेवटचा माणूस राहिलो तरी मी काँग्रेससोबत जाणार नाही, असे बाळासाहेब म्हणायचे.
त्यामुळे शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही, असेही केसरकर यांना सांगितले.

 

Web Title :- Deepak Kesarkar | ncp chief sharad pawar behind narayan rane and raj thackeray revolt against shivsena says eknath shinde camp deepak kesarkar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा