Deepak Kesarkar On Sanjay Raut | एका बापाचे वक्तव्य घाणेरडे ! ‘संजय राऊत आमच्याच मतांवर खासदार’ – दीपक केसरकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Deepak Kesarkar On Sanjay Raut | शिवसेना पक्षातील (Shivsena) बंडखोर नेते आणि आमदारांविरोधात शिवसेना नेत्यांनी लागोपाठ आक्रमक वक्तव्यांचा भडीमार सुरू केल्याने बंडखोर आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दहिसर (Dahisar) येथे केलेल्या एका वक्तव्यावरून बंडखोर आमदार दीपक केसरकार (Deepak Kesarkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Deepak Kesarkar On Sanjay Raut)

 

दहिसर येथील शिवसेना मेळाव्यात (Shivsena Melava) संजय राऊत म्हणाले की, एका बापाची अवलाद असाल तर राजीनामा द्या. तसेच राऊत यांनी म्हटले की, गुवाहाटीतील 40 आमदारांचे कामाख्या देवीला बळी द्या, त्यांचे मृतदेह थेट पोस्टमार्टेमला पाठवू. यावर एकनाथ शिंदे गटातातील सावंतवाडीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

 

केसरकरांचे राऊतांना आव्हान

केसरकर म्हणाले की, संजय राऊत हे आमच्या मतांवर खासदार झाले आहेत. याच 41 आमदारांनी राऊतांना मते दिली. यामुळे आमच्या मृत्यूवर बोलणार्‍या राऊतांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उरलेल्या मतांवर निवडून येऊन दाखवावे.

 

केसरकर पुढे म्हणाले की, त्यांनी आमचा बाप काढला, हे किती घाणेरडे वक्तव्य आहे. महाराष्ट्राने महिलांचा सन्मान केला आहे. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या पत्नीला आईची उपमा दिली होती. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणार्‍या शिवसेनेचे प्रवक्ते असले घाणेरडे वक्तव्य करत आहेत. हेच दुसर्‍या कोणी केले असते तर तो आता तुरुंगात गेला असता. मुख्यमंत्री हे काही फक्त पक्षाचे प्रमुख नाहीत, ते संविधानीक पदावर आहेत. यामुळे महाराष्ट्रात हे काय चालले आहे, ते त्यांनी पहावे.

 

51 आमदार आमच्यासोबत

दीपक केसरकरांनी दावा केला की, आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न होत आहे.
आम्हाला नव्हे, त्यांनाच राष्ट्रवादीत विलिन होण्याची वेळ आली आहे.
14 लोकांचे काय करायचे याचा विचार करावा, आमचे वेगळ्या गटाचे रजिस्ट्रेशन झाले आहे.
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले 39 आणि इतर 12 असे 51 आमदार आमच्यासोबत आहेत.

 

केसरकर म्हणाले, आम्हाला नोटीस दिल्यावर 7 दिवसांचा कालावधी दिला पाहिजे होता,
झिरवाळ यांच्याकडून तो मागून घेणार आहोत. तसेच चौधरींना गटनेता नेमले त्यावर आव्हान दिले आहे.

 

Web Title :- Deepak Kesarkar On Sanjay Raut | Shivsena leader and mp sanjay raut on our own votes resign first deepak kesarkar got angry after one father remark against eknath shindes rebel mlas

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा