Deepak Kesarkar | उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर मंत्री दीपक केसरकरांचा ठाकरे गटाला टोला, म्हणाले – ‘शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय दुसरे ते…’

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन – शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ठाणे दौऱ्यावर सडकून टीका केली. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा वारसा कधीच गेला असून उद्धव ठाकरे यांनी आता काँग्रेसचा वारसा घेतला आहे. तसेच उद्धव ठाकरे हे स्वतःच मिंधे झाले आहेत, त्यामुळे ते शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नाही. असा टोला दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य करताना दीपक केसरकर म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कधीच गेला असून उद्धव ठाकरे यांनी आता काँग्रेसचा वारसा घेतला आहे. उद्धव ठाकरे हे स्वत:च मिंधे झाले आहेत, त्यामुळे ते शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाहीत. हिंदुत्त्वापासून दूर व्हा असं बाळासाहेबांनी कधीही सांगितलं नाही. शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) ही युती बाळासाहेब ठाकरे यांनीच निर्माण केली होती.’ असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी स्थापन केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर दीपक केसरकर यांनी जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया ताईंबद्दल (Supriya Sule) मी कधीही वाईट बोलणार नाही. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना सल्ला दिला. ते म्हणाले, ‘आरोप करताना आदित्य ठाकरे यांनी संयम बाळगला पाहिजे. कारण ते त्यामधून स्वतःला आणि ठाकरे घराण्याला डॅमेज करत आहेत. असं यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या
बालेकिल्ल्यात येणार आहेत. त्यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेणार असून ठाकरे गट आज ठाण्यात
जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
Web Title :- Deepak Kesarkar | shinde group minister deepak kesrak criticizes thackeray group and uddhav thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update