Deepak Kesarkar | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक राणेंनी कशी जिंकली? शिवसेनेचे नेते दीपक केसरकर म्हणाले…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीमध्ये (Sindhudurg Bank Election) भाजपचे (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (Shivsena) अशी थेट लढत झाली. नारायण राणे आणि शिवसना समोरा-समोर असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. नारायण राणे यांनी शिवसेनेचा पराभव करत बाजी मारली. यावरुन आरोप-प्रत्यारोप होताना पहायला मिळत आहेत. त्यातच आता शिवसेनेचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राणे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. निवडणुकीत पैशांचे वाटप केल्याचा अप्रत्यक्ष आरोप दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे.

राणेंचा विजय झाला तरी भाजप पिछाडीवर

निवडणुकीत जरी नारायण राणे यांनी विजय मिळवला असला तरी, उमेदवारांचे एकूण मतदान (Voting) बघता भाजप पिछाडीवर असल्याचे पहायला मिळते. यावरुन जिल्ह्यातील मतदान राणे यांच्या बाजूने नसल्याचे स्पष्ट होते, अशी टीका केसरकर यांनी केली आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) पुढे म्हणाले, या निवडणुकांमध्ये सहा उमेदवार असे असतात की ज्यांना सर्व सभासद मतदान (Member voting) करत असतात. हे मतदान जिल्ह्यातील जनता कुणाच्या बाजुने असते याचे रिफ्लेक्शन (Reflection) असते.

निवडणुकीत पैशांचे वाटप

नारायण राणेंचा पराभव होत असल्याचे जेव्हा भाजपच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना पाठवले. चव्हाण यांनी कशाची जादू केली हे सर्वांनाच माहित आहे. आतापर्यंत माझा लढा हा दहशतवाद्यांविरोधात (Terrorist) होता. आता निवडणुकीमध्ये पैशांचे वाटप करणाऱ्यांविरोधात असेल, असे म्हणत दीपक केसरकर यांनी निवडणुकीत पैशांचे वाटप झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आहे.

ही निवडणूक राणे विरुद्ध शिवसेनाच होती

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जरी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असली तरी खरी निवडणूक नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशीच होती. बँकेत भाजपला हरवणं म्हणजे राणेंच्या वर्चस्वाला धक्का लावणं असं समीकरण होतं. त्यामुळे शिवसेना त्वेषाने निवडणुकीत उतरली. मात्र तरीही राणेंनी 11 जागांवर आपले वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले.
तर महाविकास आघाडीने 8 जागा जिंकून मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवले.
मात्र, निवडणुकीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.

 


Web Title :-
Deepak Kesarkar | shiv sena leader deepak kesarkars reaction on the election results of sindhudurg central co operative bank

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Raju Karemore | पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार कारेमोरेंना अटक

Gold Price Today | सोन्याची चमक ओसरली, चांदीही नाही चमकली, जाणून घ्या आजचा नवीन दर

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांचा आकडा वाढला, गेल्या 24 तासात 12,160 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Joint CP Dr Ravindra Shisve | केंद्र शासनाकडून पुण्याचे ज्वाईंट सीपी डॉ. रवींद्र शिसवेंना IG Empanelment; सह आयुक्त म्हणाले – ‘बहुमान मिळाल्यानं आनंद’

Anil Parab | केंद्राने दिलेली मुदत संपल्याने मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाईची शक्यता

Corporator Dhiraj Ghate | चाळीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यात वाढ, पालिकेने पुनर्विचार करावा; नगरसेवक धीरज घाटेंचे आयुक्तांना निवेदन