Deepak Kesarkar | ‘मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय केलं, याचा खुलासा करणार’, दीपक केसरकरांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंड (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. 40 आमदार आणि 13 खासदार शिंदे गटात सामील झाले. यानंतर ठाकरे (Thackeray Group) आणि शिंदे गटांकडून (Shinde Group) आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले. शिवसेनेत कशा प्रकारे अन्याय होत होता, याचा दावा अनेक नेत्यांनी केला. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनत असतानाचा एक प्रसंग माध्यमांशी बोलताना सांगितला. यावेळी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

 

अजूनही उद्धव ठाकरेंना कळत नाही…

उद्धव ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी पक्षप्रमुख पदाची मुदत संपत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, त्यांनी पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली. यावर दीपक केसरकर म्हणाले, ही त्यांची धडपड आहे. खरंतर याचा विचार त्यांनी राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेससोबत (Congress) जाताना करायला हवा होता. पण अजूनही त्यांना कळत नाहीये की राष्ट्रवादी त्यांना संपवायला निघाली आहे, असे केसरकर म्हणाले. खऱ्या अर्थाने आम्ही शिवसेना जीवंत ठेवली आहे, बाळासाहेबांचे विचार जीवंत ठेवले आहेत, असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

 

मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय केलं…

एकनाथ शिंदे यांचा अपमान झाला होता. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी विचारलं की तुम्हाला मुख्यमंत्रीपद (CM) हवंय का? तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं की आपण शिवसेनेसाठी केलेल्या त्यागाची किंमत अशा रीतीने केली जात आहे. मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय केलं, याचा खुलासा येत्या दोन-चार दिवसांत मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून करणार आहे, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला.

 

बाळासाहेबांचा एवढा मोठा अपमान कोणी केला नाही

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra)
सहभागी झाल्यावरुन केसरकर यांनी राऊतांना टोला लगावला.
हिंदुस्थानावर जो प्रेम करतो, तो हिंदू आहे, असं बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणायचे.
अशा बाळासाहेबांच्या स्वप्नांना जी काँग्रेस विरोध करत होती, त्यांना काश्मीरमध्ये (Kashmir)
जाऊन भेटणं एवढा मोठा अपमान बाळासाहेब ठाकरेंचा कुणी केला नाही तो संजय राऊतांनी केला असं मला वाटत.
त्यामुळे जे लोक सत्तेसाठी काँग्रेसचे पाय धरतात, राष्ट्रवादीच्या मागे धावतात. त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असेही केसरकर म्हणाले.

 

 

 

Web Title :- Deepak Kesarkar | shivsena eknath shinde group minister deepak kesarkar targets uddhav thackeray ncp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा