Deepak Kesarkar | ‘राज्यात कुरमुड्या ज्योतिषांची संख्या वाढली’, दीपक केसरकरांची टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुढील पंधरा दिवसात महारष्ट्रातील सरकार कोसळेल असा दावा केला आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी कुरमुड्या ज्योतिषांची संख्या वाढली आहे अशी टीका संजय राऊतांवर केली आहे. तसेच ठाकरे गटाच्या उपनेत्या देखील ज्योतिश सांगायला लागले आहेत. जर ज्योतिषावर राज्याचे भवितव्य ठरायला लागले तर मग महाराष्ट्र राज्य म्हणायला काय अर्थ आहे? असे प्रश्न उपस्थित करत दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना टोला लगावला.

 

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विशेष करुन ठाकरे गटाकडून सतात्याने सरकार पडणार असल्याचा दावा केला जात आहे. यावर दीपक केसरकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. राज्यात कुडमुड्या ज्योतिषांची संख्या वाढली आहे. सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल यायला तेवढा तरी अवधी द्या. लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ते त्यांच्या पक्षाचं ऐकत नाही का? यामध्ये मला शंका वाटते. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना समजून सांगण्यीच गरज असल्याचे केसरकर (Deepak Kesarkar ) म्हणाले.

गुलाबराव पाटलांना समज देणार
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) असे बोलले असतील तर त्यांना निश्चितच समजून सांगितले जाईल. ज्या पद्धतीने त्यांना चिडवले जाते शेवटी तोंडातून काहीतरी वदवून घ्यायचे आणि मग त्यांच्यावरच आरोप सुरु करायचे. समोरुन आलेले वक्तव्य पण बघा. मुद्दाम चिडवले जाते आणि एखादे चुकीचे वाक्य आले तर त्याचं भांडवल करायचं. राजकीय बदनामी करायची हे जे काही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सुरु केले तो एक मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. महाराष्ट्राच्या जनतेने याच्यापासून सावध राहिले पाहिजे, असं स्पष्टीकरण गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर दीपक केसरकर यांनी दिले.

 

Web Title :- Deepak Kesarkar | shivsena spokesperson deepak kesarkar has once again criticized the thackeray group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nashik ACB Trap | नाशिक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍याविरूध्द लाच प्रकरणी गुन्हा

Ajit Pawar | तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार-आमदारांना अपात्र करा, अजित पवारांची केंद्राकडे मागणी

Pune News | पुणे : कृषि विभागामार्फत ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची’ अभियान राबविण्यात येणार