Deepak Kesarkar | ‘…म्हणून आम्ही भाजपसोबत’ – दीपक केसरकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Deepak Kesarkar | शिंदेंच्या बंडामुळे अखेर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीनामा (Resigned) दिला आणि आता शिंदे हे फडणवीसांसोबत बहुमत सिद्ध करणार असल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुंबईत दाखल झाले असून ते देवेंद्र फडणवीसांशी (Devendra Fadnavis) चर्चा करुन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यामुळे भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) पुन्हा एकदा राज्यात सरकार पाहायला मिळणार आहे. दरम्यान ‘भाजपसोबत जाण्यावर आम्ही ठाम आहोत. पुढील रणनिती ठरविण्यात येईल. मात्र, उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. आम्ही शिवसेनेत आहोत. परंतु समविचारी म्हणून भाजपसोबत जात आहोत,’ असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितलं.

 

माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावेळी आम्ही कोणतेही सेलिब्रेशन केलेले नाही. ते आमचे नेते आहेत आणि पुढेही असणार आहेत. त्यांच्याबद्दलचा आदर आमच्या मनात कायम आहे. ज्यांना घेऊन सत्ता स्थापन केली. त्याला आमचा विरोध होता. ही भूमिका कायम होती आणि आहे. आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. मंत्रिमंडळाबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात कोण असेल तर तसे काहीही नाही. याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. शिंदे यांच्यासोबत आलेले आमदार आहेत, त्यांच्या मनात मंत्रीपदाबाबत काहीही निर्णय नाही.” असं ते म्हणाले.

 

पुढे केसरकर म्हणाले, “आम्ही ठाकरे कुटुंबाच्या विरोधात नाही. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबतची युती तोडली तर आम्ही त्यांच्याशी बोलायला तयार आहोत. पण तरीही ते त्यांच्यासोबत आहेत. ठाकरेंविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो नाही. ठाकरेंबद्दल अजूनही आदर आहे. शिवसेना पक्ष नाहीसा करण्याचा प्रयत्न झाला होता. शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रयत्न सुरु होता. शिवसेनेच्या मतदार संघातील 2 नंबरच्या उमेदवाराला दोन्ही काँग्रेसकडून पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत माहिती दिली होती.
पण, आजही ते महाविकास आघाडीसोबत आहेत.”

दरम्यान, “राष्ट्रवादी आणि काँग्रेस मुळे आम्हाला आमची भूमिका मांडावी लागली.
मुख्यमंत्री आजही आमचे नेते आहेत. मूळ विचारधारेबरोबर राहावं अशी आमची इच्छा आहे.
आमच्या आमदारामध्ये संभ्रम व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मंत्रिमंडळमध्ये हा मंत्री असेल तो असेल असं नाही.
भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, जो काही निर्णय असेल तर ते घेतील. असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Deepak Kesarkar | uddhav thackeray is our leader but with bjp as a like minded political party deepak kesarkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत उध्दव ठाकरेंना 4 वेळा सांगितलं होतं ? जाणून घ्या

 

Airtel 365 Days Validity Plan | एक वर्षापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील सिम, मिळतील अनलिमिटेड कॉल्स; डेटा आणि SMS, ‘हा’ सर्वात स्वस्त एअरटेल प्लान

 

LIC Jeevan Umang Policy | ‘या’ स्कीममध्ये दररोज करा 45 रुपयांची गुंतवणूक, एकाच वेळी मिळतील 36 लाख