Deepak Kesarkar | राष्ट्रवादी-काँग्रेससोबतची आघाडी तोडा, आजही तुमचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार – दीपक केसरकर

0
2072
Deepak Kesarkar | uddhav thackeray should break alliance with congress ncpaccept leadership today deepak kesarkar kolhapur
file photo

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस (Congress) – राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फसविले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची आघाडी उद्धव ठाकरे यांनी तोडावी, आजही आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, अशी भूमिका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी रविवारी कोल्हापूर येथे मांडली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने (Paschim Maharashtra Devasthan Samiti) श्री अंबाबाई मंदिराच्या कामांना सुरुवात केली. याची पाहणी करण्यासाठी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) कोल्हापूर येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

 

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, आम्ही जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून त्यांनी आमदार केले आहे. आज जनता आमच्यासोबत आहे. आम्हाला विकतचे जायचे असते तर अडीच वर्षात केव्हाही गेलो असतो. उद्धव ठाकरे यांना आम्ही फसवलेले नाही. त्यांनी स्वत:च आम्हाला निघून जाण्यास सांगितले आहे. ही बाजू जनतेसमोर कधीतरी मांडली पाहिजे, असे केसरकर म्हणाले.

 

केसरकर पुढे म्हणाले, दिल्लीत जेव्हा उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भेटले तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात हिंदुत्वाचा विचार सोडल्याबद्दल चूक झाल्याचे त्यांनी कबुल केले होते. महाराष्ट्रात गेल्या गेल्या ती दुरुस्त करु असा शब्द त्यांनी दिला होता. मात्र त्यांनी तो मोडला. त्यामुळे त्यांनीच जनतेची फसवणूक केली. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने फसवले, त्याचा दोष त्यांनी आमच्यावर काढल्याचे दीपक केसरकर म्हणाले.

आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधताना दीपक केसरकर म्हणाले,
कोणाला खोके-खोके म्हणता, खोक्यासोबत खेळायची आदित्य यांना लहानपणापासून सवय असेल, आम्हाला नाही.
जनता आमच्या सोबत आहे, म्हणून आम्ही आमदार आहोत, असा टोला त्यांनी लगावला.
ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणाचा निधी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 25 कोटींपर्यंत घटवला.
त्यावेळी आदित्य ठाकरे कुचेष्टेने हसत होते. याचे व्हिडिओ आहेत.
त्यांना कोकणाबाबत किती अस्था आहे हे समोर आले पाहिजे, असेही दीपक केसरकर म्हणाले.

 

Web Title :- Deepak Kesarkar | uddhav thackeray should break alliance with congress ncpaccept leadership today deepak kesarkar kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले

Pune Crime News | मेफेड्रोन, चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त