Deepak Kesarkar | मनसे-शिंदे-भाजप महायुती होणार का? – दीपक केसरकर म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Deepak Kesarkar | महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळले आणि शिंदे-भाजप सरकार (Shinde-BJP Government) सत्तेत आले. त्याचबरोबर या नवीन सरकारचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यासोबत संबंध देखील वाढीला लागले. गेल्या अनेक दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे यांच्या वरच्यावर भेटीगाठी सुरु आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि जनतेत त्यांच्या महायुतीची चर्चा आहे. त्यावर आता शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

परस्परांना सहकार्य करण्याच्या राजू पाटील (MLA Raju Patil) यांच्या वक्तव्याचे आभारच आहेत. राजू पाटील यांनी महायुतीचे संकेत दिले असले, तरी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत मी बोलणार नाही. एकत्र येऊन काम करणे, ही काळाची गरज आहे. आम्हाला मुंबईकरांचे जीवन सुखी करायचे आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही करायचे आहे, ते एकत्र येऊन केले पाहिजे. प्रत्यक्षात युती होणे आणि न होणे हा भाग वेगळा आहे, असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी युतीबाबत संकेत दिले होते. आमची मने केव्हाच जुळली आहेत.
आता फक्त तारा जुळायच्या बाकी आहेत, असे राजू पाटील म्हणाले होते.
शिंदे सरकार आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत असेल, तर आम्हाला एकत्र येण्यास काहीच अडचण नाही.
पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला नाही.
त्या कशा अपूर्ण राहतील याकडे लक्ष देण्यात आले होते, असे राजू पाटील म्हणाले होते.

 

मुख्यमंत्री शिंदे यांनी युतीच्या बाजारगप्पांबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली होती.
आम्ही राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला त्यांच्या आमंत्रनाचा मान ठेऊन गेलो होतो.
त्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता. आमच्यात दिवाळीवर चर्चा झाली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

Web Title :- Deepak Kesarkar | will there be alliance between the mns shinde group statement by deepak kesarkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepak Kesarkar | ‘दगडाला पाझर फुटला नाही, म्हणूनच…’, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Nana Patole | मुख्यमंत्र्यांचे नाना पटोलेंना खोचक प्रत्युत्तर, म्हणाले – ही मागणी हास्यास्पद, विरोधकांना धडकी भरल्यानेच…

WhatsApp Down | तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सॲप डाऊन, ग्रुप्सवर मेसेजिंग थांबलं!