Deepak Kesarkar | ‘राऊतांना विचारा, अलिशान घरे, गाड्या, संपत्ती कोठून आले?’, दीपक केसरकरांचा राऊतांवर पलटवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) करुन भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. यानंतर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) खोके सरकार असे म्हणत शिंदे गटावर (Shinde Group) टीका केली जात आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही शिंदे गटावर खोके घेतल्याचा आरोप अनेकवेळा केला आहे. या आरोपांवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी जोरदार पलटवार केला आहे. तुमचे अलिशान घरे आणि गाड्या या खोक्यातूनच आल्या आहेत ना? अशी संतप्त प्रतिक्रिया दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली.

पुणे विद्यापीठात (Pune University) एनएसएस अधिकारी अधिवेशनानंतर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राऊतांनी आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करुन दाखवावेत. त्यांनी स्वत:ला विकावे, आम्ही कोणी स्वत:ला विकलेले नाही. पहिल्यांदा आपल्या आमदारांचा मान ठेवायला शिका, लोकप्रतिनिधींना काय मान असतो याची जाणीव नसेल तर राजकीय पक्ष का स्थापन केला? शिंदे हे मदतीला आल्यानेच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. तुमचे आलिशान घरे आणि महागड्या गाड्या, एवढी संपत्ती या खोक्यातूनच आली आहेत ना? अशा शब्दात केसरकर यांनी घणाघात केला.

भविष्य सांगणाऱ्या पोपटाप्रमाणे…

दीपक केसरकर म्हणाले, संजय राऊतांची विधानं ही कन्फ्युजन निर्माण करणारी असतात. ते भविष्य सांगणाऱ्या पोपटाप्रमाणे रोज एक कार्ड काढतात. शिवसेनेने (Shivsena) महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडावं ही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची सूचना योग्य आहे. महाविकास आघाडी शिवसेना संपवतेय हे खरं असल्याचे केसरकर म्हणाले.

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढऊ

दीपक केसरकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
यावर बोलताना ते म्हणाले, मला दिल्लीत जाण्यात रस नाही.
मी शिक्षण मंत्री म्हणून चांगले काम करत नाही असे तुम्हाला वाटते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ते पुढे म्हणाले की, विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्याविरोधात लढण्याची माझी इच्छा नाही.
परंतु पक्षाने आदेश दिला तर समोर कोण हे दुय्यम आहे.

Web Title :  Deepak Kesarkar | your luxury houses cars have come from khake deepak kesarkars counter attack on sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

National Service Scheme (NSS) Pune | सामाजिक जाणीव निर्मितीचा उपक्रम अधिक सशक्त करण्याची गरज – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Pune Traffic Police | नो पार्किंगला गाडी लावताय तर सावधान; वाहतूक पोलिसांकडून बसेल मोठा भुर्दंड

IAS Dr Rajesh Deshmukh | शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख